TRENDING:

शिर्तव्या, ऋनई या ट्रेडिंग नावांपेक्षा राजकुमारने ठेवलं लेकीचं साधं-सिम्पल नाव, होतेय चर्चा

Last Updated:
Rajkumar Rao and Patralekha : राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी नोव्हेंबर 2025 मध्ये छोट्या पाहुणीचं आगमन झालं. आता लेकीचा पहिला फोटो शेअर करत त्यांनी नाव रिवील केलं आहे.
advertisement
1/7
राजकुमारने ठेवलं लेकीचं साधं-सिम्पल नाव, होतेय चर्चा
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या घरी 15 नोव्हेंबर 2025 रोजी चिमुकलीचं आगमन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती.
advertisement
2/7
राजकुमार आणि पत्रलेखा यांनी सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे,"आम्ही खूप आनंदी आहोत. देवाने आम्हाला एका गोड सुंदर मुलीच्या रुपात आशीर्वाद दिले आहेत. आमच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवशी दिवाने दिलेला हा मोठा आशीर्वाद आहे".
advertisement
3/7
राजकुमार राव आणि पत्रलेखा 15 नोव्हेंबर 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले होते. मिडिया रिपोर्टनुसार, लग्नाआधी तब्बल 11 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. 2010 मध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. पत्रलेखा आणि राजकुमार राव 2014 मध्ये आलेल्या 'सिटिलाइट्स' या फिल्ममध्ये एकत्र झळकले होते.
advertisement
4/7
राजकुमार आणि पत्रलेखा यांची एक अनोखी बॉलिवूडमधील लव्हस्टोरी आहे. राजकुमार राव पहिल्या भेटीतच पत्रलेखाच्या प्रेमात पडला होता. त्याने एका जाहिरातीत पत्रलेखाला पाहिलं होतं. त्याचवेळी ही आपली जोडीदार असेल, असं त्याने ठरवलं होतं.
advertisement
5/7
राजकुमार राव सध्या नेटफ्लिक्सच्या 'टोस्टर' या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या सिनेमात सान्या मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अविनाश अरुण दिग्दर्शित एका कोर्टरूम ड्रामा बायोपिकमध्येही झळकणार आहे.
advertisement
6/7
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी लेकीचं नावदेखील जाहीर केलं आहे.
advertisement
7/7
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी आपल्या लेकीचं नाव 'पार्वती पॉल राव' असं ठेवलं आहे. 'पार्वती' या नावाचा अर्थ पर्वतांची कन्या. सौंदर्य, शक्ती आणि सौहार्दाचे प्रतीक मानले जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
शिर्तव्या, ऋनई या ट्रेडिंग नावांपेक्षा राजकुमारने ठेवलं लेकीचं साधं-सिम्पल नाव, होतेय चर्चा
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल