Rakhi Sawant : "डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा, बुर्ज खलिफात 4-5 फ्लॅट"; दुबई रिटर्न राखी सावंत काय काय बरळली?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नुकतीच मुंबईत स्पॉट झाली असून तिने 'Bigg Boss 19'सह दुबई, डोनाल्ड ट्रम्प अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
advertisement
1/7

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये 'बिग बॉस', दुबई, डोनाल्ड ट्रम्प, बुर्ज खलिफा अशा अनेक गोष्टींवर प्रतिक्रिया देताना राखी सावंत दिसत आहे.
advertisement
2/7
राखी सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून गायब होती. पण आता पुन्हा एकदा ती परतली असून आता 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
advertisement
3/7
राखी सावंत म्हणाली,"माझी आई आज या जगात नाही. पण आईने निधनाआधी मला एक चिठ्ठी दिली होती. या चिठ्ठीत माझे खरे वडील डोनाल्ड ट्रम्प आहेत. मी बुर्ज खलिफा विकत घेतला असल्याचं लिहिलेलं राखी म्हणाली.
advertisement
4/7
राखी पुढे म्हणाली,"मी तान्या मित्तलपेक्षा जास्त श्रीमंत आहे. बुर्ज खलिफामध्ये माझे 4-5 फ्लॅट आहेत. अनेक व्हिला आहेत".
advertisement
5/7
राखी सावंत म्हणाली,"मी नाश्त्यात बकलावा-हकलावा खाते. खजूर, तूप अशा सर्व गोष्टींनी मी अंघोळ करते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी विणलेल्या साड्या मी निसते".
advertisement
6/7
"माझ्याकडे 200 बॉडीगार्ड आहेत. मला घरात बाथरुमला जरी जायचं असेल तरी मी सायकलचा वापर करते. माझं घर खूप मोठं आहे", असं राखी सावंत म्हणाली.
advertisement
7/7
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचे व्हिडीओ सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. राखीने तानिया मित्तलला हे टोमने मारले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rakhi Sawant : "डोनाल्ड ट्रम्प माझे पप्पा, बुर्ज खलिफात 4-5 फ्लॅट"; दुबई रिटर्न राखी सावंत काय काय बरळली?