62 वर्षांचा मराठी अभिनेता, ज्याचा फिटनेस पाहून थक्क झाला रणबीर कपूर; म्हणाला, 'तुमच्या वयाचा झाल्यावर ...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
62 वर्षांच्या मराठी अभिनेत्यासमोर बॉलिवूडच्या रणबीर कपूरचा फिटनेस देखील फिका पडला. रणबीर कपूरने स्वत: ते कबूल केलं.
advertisement
1/9

अभिनेता रणबीर कपूर हा बॉलिवूडचा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याचा आतापर्यंतचा सर्वात बिग बजेट सिनेमा रामायण प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो प्रभु रामांच्या प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्या या सिनेमासाठी सगळेच उत्सुक आहेत.
advertisement
2/9
रणबीर कपूर नेहमीच त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या लुक्समुळे आणि फिटनेससाठीही ओळखला जातो. रणबीर कपूर नेहमीच फिट असल्याचं पाहायला मिळालं आहे. स्वत: फिट असलेल्या रणबीरला मात्र एका मराठमोळ्या अभिनेत्याचा फिटनेस प्रचंड भावला आहे.
advertisement
3/9
62 वर्षीय मराठी अभिनेत्याचा फिटनेस पाहून रणबीर कपूर थक्क झाला. मराठी अभिनेत्याने स्वत: रणबीरने त्याच्या फिटनेसकडे पाहून दिलेली प्रतिक्रिया सांगितली. इतकंच नाही तर अभिनेत्यानं रणबीर कपूर माणूस म्हणूनही कसा आहे याबद्दलही सांगितलं.
advertisement
4/9
आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय ते अभिनेते म्हणजे अजिंक्य देव. वयाच्या 62 व्या वर्षी अजिंक्य देव प्रचंड फिट आहेत. अजिंक्य देव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप पाडणाऱ्या अजिंक्य देव यांचा '120 बहादूर’ हा आगामी सिनेमा रिलीज होतोय.
advertisement
5/9
त्याचबरोबर ते नितेश तिवारींच्या भव्यदिव्य 'रामायण' सिनेमात विश्वामित्रांच्या भुमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट रणबीर कपूरबरोबर झाली. रणबीर त्यांचा फिटनेस पाहून थक्क झाला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रणबीरसोबतच्या कामाचा अनुभव सांगितला.
advertisement
6/9
अजिंक्य देव म्हणाले की, "रणबीर कपूरने सेटवर त्यांना खूप कम्फर्टेबल फील करवून दिलं. सीन झाल्यानंतर तो नेहमीच माझं कौतुक करायचा. ‘काय छान शॉट दिला सर,’ असं म्हणायचा."
advertisement
7/9
अजिंक्य देव यांच्या फिटनेसनेही रणबीर कपूर भारावून गेला होता. तो म्हणायचा, "सर, तुम्ही तुमच्या वयाचे वाटतच नाही. तुम्ही कुठे वर्कआउट करता?’ मी म्हणायचो, ‘थँक्यू बॉस… तुझ्याकडे बघ आणि माझ्याकडे बघ!"
advertisement
8/9
रणबीरने त्यावेळी एक वाक्य म्हटलं होतं, जे अजिंक्य यांना खूप भावलं. रणबीर म्हणाला होता, "सर तुमच्या वयाचा होईपर्यंत माझं काय होईल, मला माहीत नाही."
advertisement
9/9
अजिंक्य देव यांनी रणबीरविषयी बोलताना सांगितलं, "रणबीर कपूर हा अत्यंत निर्मळ मनाचा कलाकार आहे. तो जसा आहे तसाच वागतो. कोणतेही फिल्टर नाहीत. त्यामुळेच प्रेक्षकांशी त्याचा थेट कनेक्ट निर्माण होतो."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
62 वर्षांचा मराठी अभिनेता, ज्याचा फिटनेस पाहून थक्क झाला रणबीर कपूर; म्हणाला, 'तुमच्या वयाचा झाल्यावर ...'