TRENDING:

राणी मुखर्जी आणि काजोल सोबत दुर्गा पूजेत सहभागी झाली कतरिना कैफ; पाहा फोटो

Last Updated:
आज देशभरात नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच नवमी साजरी करण्यात आली. बॉलिवूड सेलिब्रिटीही आनंदात नवरात्रीचा उत्सव साजरा करत आहेत. नुकतंच दुर्गापूजेच्या वेळी बॉलिवूड स्टार्सनीही पारंपारिक लूकमध्ये पोहोचत दुर्गा मातेची पूजा केली.
advertisement
1/7
राणी मुखर्जी आणि काजोल सोबत दुर्गा पूजेत सहभागी झाली कतरिना कैफ; पाहा फोटो
काजोल, राणी मुखर्जी, कतरिना कैफ आणि भाग्यश्रीसह बॉलीवूड तारे मुंबईतील जुहू येथील नॉर्थ बॉम्बे सर्वोजनीन दुर्गा पूजेसाठी पोहोचले होते.
advertisement
2/7
या स्टार्ससोबत राजकुमार रावही त्याची पत्नी पत्रलेखा सोबत पारंपरिक कपड्यांमध्ये दुर्गा पूजा करण्यासाठी पोहोचला होता.
advertisement
3/7
या बॉलिवूड स्टार्सनी देवी समोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी कतरिना कैफ सुंदर पिवळ्या साडीत सहभागी झाली होती. दुर्गापंडालमध्ये काजोलही तिच्या मुलासोबत दिसली होती.
advertisement
4/7
राणी मुखर्जी आणि काजोल दरवर्षी मोठ्या थाटामाटात माँ दुर्गेचा हा सण साजरा करत आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या स्टार्स दुर्गापूजेत सहभागी झाल्या होत्या.
advertisement
5/7
काजोल आणि राणी मुखर्जीने यावेळी एकमेकींसोबत फोटोसाठी भरपूर पोज दिल्या. या खास प्रसंगी दोघीही खूप सुंदर दिसत होत्या.
advertisement
6/7
यंदा दुर्गा पूजेत सोनम कपूरही सहभागी झाली होती.
advertisement
7/7
या सर्व तारकांनी माँ दुर्गेच्या पूजेत उत्साहाने सहभाग घेतला आणि ग्रुपमध्ये भरपूर फोटोही काढले. सगळ्याच जणी खूप आनंदी दिसत होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राणी मुखर्जी आणि काजोल सोबत दुर्गा पूजेत सहभागी झाली कतरिना कैफ; पाहा फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल