TRENDING:

वयाच्या 71 व्या वर्षी रेखाचं कमबॅक? 11 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर, तरी कोट्यवधींची कमाई, कुठून येतो इतका पैसे!

Last Updated:
Rekha : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा लवकरच रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. मनीष मल्होत्रा यांनी याबाबत खुलासा केला आहे. फॅशन डिझायनर आणि निर्माता असलेल्या मनीष मल्होत्रा यांनी सांगितले की, ते त्यांच्या आगामी चित्रपटात रेखाला कास्ट करणार आहेत. विशेष म्हणजे रेखा गेल्या 11 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे पण तरी त्यांची नेट वर्थ अब्जांत आहे.
advertisement
1/7
वयाच्या 71 व्या वर्षी रेखाचं कमबॅक? 11 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा आता 11 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यास सज्ज आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्या रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहेत. रेखा यांचा खास मित्र आणि फॅशन झिझायनर, निर्माता मनीष मल्होत्रा यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. सध्या ते विजय वर्मा आणि फातिमा सना शेख यांच्या ‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. 28 नोव्हेंबर 2025 रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. मनीष यांनी सांगितले की रेखा त्यांच्या चित्रपटात एका कॅमियोमध्येही दिसणार होत्या.
advertisement
2/7
रेखा यांनी 1970 मध्ये 'सावन भादो' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रेखा त्याकाळी सर्वात लोकप्रिय आणि महागड्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. 2014 मध्ये आलेल्या 'सुपर नानी' या चित्रपटात त्यांनी शेवटचं काम केलं आहे. रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला असून त्यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन असं आहे. आजवर त्यांनी 200 हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. त्यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
advertisement
3/7
'न्यूज 18'सोबत रेखाच्या कमबॅकबद्दल बोलताना विजय वर्मा म्हणाले,"‘गुस्ताख इश्क’ या चित्रपटासाठी मनीष मल्होत्रा रेखाला कास्ट करू इच्छित होते. पण दिग्दर्शकाच्या मते ही भूमिका रेखा या दिग्गज अभिनेत्रीपेक्षा खूपच लहान आहे".
advertisement
4/7
विभु पुरी म्हणाले,"गुस्ताख इश्क' या चित्रपटातील ही भूमिका छोटी असली तरी महत्त्वाची होती. या चित्रपटातील या भूमिकेसाठी रेखाला विचारणा करायला हवी यासाठी मनीष सतत आग्रह धरत होता. पण नंतर असा विचार केला की अर्ध्या दिवसाच्या कामासाठी त्यांना बोलावणं योग्य नाही".
advertisement
5/7
मनीष मल्होत्रा पुढे म्हणाले की,"रेखा जरी 'गुस्ताख इश्क'चा भाग नसल्या तरी त्यांनी माझ्या एखाद्या चित्रपटात काम केलं तर मला आवडेल. त्यांना योग्य स्क्रिप्ट मिळाली तर त्या नक्कीच भूमिका करायला इच्छुक असतील. आव्हान देणारी भूमिका त्यांना मिळायला हवी. अशा स्क्रिप्टचा शोध सध्या सुरू आहे".
advertisement
6/7
रेखा गेल्या 11 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहेत. फक्त 1-2 वेळा त्यांनी फक्त कॅमिओ रोलच केला आहे. विशेष म्हणजे 11 वर्षांपासून सिनेमापासून दूर असूनही त्या अब्जावधींच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. एका रिपोर्टनुसार, रेखा यांनी अंदाजे नेटवर्थ 332 कोटी रुपयांच्या आसपास आहे. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या नावावर 25 कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता आणि साड्यांचा एक अप्रतिम कलेक्शन आहे. त्या पुरस्कार सोहळे आणि इतर कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहण्यासाठी मोठं मानधन घेतात.
advertisement
7/7
रेखा मुंबईतील वांद्रा बँडस्टँड येथे राहतात. त्यांच्या आलिशान बंगल्याचं नाव ‘बसेरा’ असून त्याची किंमत अंदाजे 100–150 कोटी रुपये आहे. त्याशिवाय त्यांच्या नावावर अनेक मालमत्ता आहेत ज्यातून त्यांना प्रचंड भाडं मिळतं. रेखाकडे लक्झरी गाड्यांचाही मोठं कलेक्शन आहे. मर्सिडीज-बेंझ S-Class (₹2.17 कोटी), Audi A8 (₹1.63 कोटी), होंडा सिटी आणि BMW i7 इलेक्ट्रिक लक्झरी सेडान (₹2.03 कोटी) या गाड्या त्यांच्या कार कलेक्शनमध्ये आहेत. तसेच त्यांच्याकडे 6 कोटी रुपयांची Rolls Royce Ghost देखील आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वयाच्या 71 व्या वर्षी रेखाचं कमबॅक? 11 वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर, तरी कोट्यवधींची कमाई, कुठून येतो इतका पैसे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल