TRENDING:

लग्न करून कित्येक वर्ष झाली, अजूनही TV इंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या नाहीत आई, एकीला तर बाळ नकोच

Last Updated:
These Actress Do not Want to Become Mothers : TV इंडस्ट्रीतील आठ अभिनेत्री लग्नानंतरच्या काही वर्षांनीदेखील आई झालेल्या नाहीत.
advertisement
1/9
TV इंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या नाहीत आई, एकीला तर बाळ नकोच
बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्री आपल्या कामांसह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. TV इंडस्ट्रीतील आठ अभिनेत्रींनी लग्नाच्या काही वर्षांनंतरही फॅमिली प्लॅनिंगचा विचार केलेला नाही. विशेष म्हणजे यातील एका अभिनेत्रीला तर आयुष्यात कधीच प्रेग्नंट राहायचं नाही आहे.
advertisement
2/9
अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) : अंकिता लोखंडे आणि विकी जैन टीव्हीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. अनेकदा अंकिताच्या प्रेग्नंसीच्या चर्चा समोर आल्या आहेत. अनेक मिडिया रिपोर्ट्समध्ये अंकिता प्रेग्नंट असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं होतं की तिने अद्याप बाळाचा विचार केलेला नाही.
advertisement
3/9
दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया 2016 मध्ये विवाहबंधनात अडकले. पण आता ते आपलं कुटुंब वाढविण्याचा विचार कधी करतायत याची चाहत्यांना उत्सुकता आहे. पण दिव्यांका आणि विवेक अजून बाळाची जबाबदारी घेण्यास तयार नाहीत.
advertisement
4/9
आकांक्षा चमोला (Akansha Chamola) : आकांक्षा चमोल टीव्ही स्टार गौरव खन्नाची पत्नी आहे. काही दिवसांपूर्वीच ती 'बिग बॉस 19'मध्ये दिसली होती. आकांक्षा आणि गौरवच्या लग्नाला 9 वर्ष झाली असली तरी अजून ते आई-बाबा झालेले नाहीत.
advertisement
5/9
कविता कौशिक (Kavita Kaushik) : कविता कौशिक आणि रोनित बिस्वास 2017 मध्ये लग्नबंधनात अडकले. पण आयुष्यात प्रेग्नंट होण्यास कविता कौशिकचा स्पष्ट नकार आहे. तिच्यामते ती आणि रोनित एकमेकांचे आई-वडील आणि मुलंदेखील आहेत.
advertisement
6/9
मदालसा शर्मा (Madalsa Sharma) : मदालसा शर्मा आणि महाक्षय आपल्या वैवाहिक आयुष्यात सुखी आहेत. 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं. बाळाची जबाबदारी घेण्यास सक्षम झाल्यावर मदालसा आणि महाक्षय फॅमिली प्लॅनिंगचा विचार करतील.
advertisement
7/9
पायल रोहतगी (Payal Rohatgi) : पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांनी धुमधडाक्यात लग्न केलं होतं. पायलला आई होण्याची इच्छा आहे पण काही आरोग्यविषयक सम्यांमुळे तिला अडचणी येत आहेत.
advertisement
8/9
सरगुन मेहता (Sargun Mehta) : सरगुन मेहता आणि रवी टीव्हीचे पावर कपल आहेत. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरते. पण लग्नाच्या 12 वर्षांनंतरही ते आई-बाबा झालेले नाहीत.
advertisement
9/9
सनाया ईरानी (Sanaya Irani) : सनाया ईरानी आणि मोहित सहगल यांनी आपल्या केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावलं आहे. पण सनाया ईरानीने अजून प्रेग्नंसीचा विचार केलेला नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
लग्न करून कित्येक वर्ष झाली, अजूनही TV इंडस्ट्रीतील या अभिनेत्री झाल्या नाहीत आई, एकीला तर बाळ नकोच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल