200 कोटींचा 'रावडी राठोड', त्यातील अक्षय कुमारची मुलगी आठवतेय! ती सध्या काय करते ?
- Published by:Suraj Yadav
- Edited by:Minal Gurav
Last Updated:
Bollywood Film : 'रावडी राठोड' चित्रपटात एक बालकलाकार होती. तिने अक्षय कुमारच्या मुलीची भूमिका केली होती. सध्या ती काय करते ?
advertisement
1/7

अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपटातून बॉलिवूड करियरमध्ये दिले आहेत. त्याने विनोदी, भावनिक आणि ॲक्शन सीन असणारे अनेक चित्रपट केले आहेत.
advertisement
2/7
चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या एका ॲक्शन सीन चित्रपटात अक्षय कुमार दिसला होता. तो चित्रपट म्हणजे 'राऊडी राठोड '. त्यात खिलाडी अक्षय कुमारचा रोमँटिक अंदाज, डान्स आणि ॲक्शन सीन पाहायला मिळतो.
advertisement
3/7
सध्या चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी हे या राऊडी राठोड चित्रपटाचा दुसरा पार्ट करायच्या तयारीत आहेत. पण या दुसऱ्या पार्टमध्ये अक्षय कुमारचा पत्ता कट केलेला आहे. ते एका वेगळ्या पॅन इंडिया स्टार अभिनेत्याला कास्ट करणार आहेत.
advertisement
4/7
या चित्रपटाचा पहिला पार्ट हा 2012 साली आला होता. ज्यात खिलाडी अक्षय कुमारसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा दिसली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळाले होते. त्यामुळे बक्कळ कमाई या चित्रपटाने केली होती.
advertisement
5/7
या चित्रपटाच्या कथेसोबतच यातील गाणी, डांस या व्यतिरिक्त अजून एका गोष्टीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. ते म्हणजे चित्रपटातील अक्षय कुमारची मुलगी. त्या बालकलाकाराने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तिचे नाव सानिया अंकलेसेरिया आहे.
advertisement
6/7
सानिया अंकलेसेरिया या चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत होती. तिची निरागसता प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडली होती. तिने बालकलाकार म्हणून 'रांझणा', 'लाइफ्ट गुड', 'बॉम्बरिया', 'आतंकवादी अंकल' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
advertisement
7/7
तिने सध्या अभिनयाच्या शिक्षणासोबतच मुंबई कॉलेजमधून कंप्यूटर इंजीनियरींग केले आहे. पदवी घेतल्यानंतर ती आता वेब डेवलपर पदावर एका कंपनीत काम करत आहे. ती डान्सही शिकत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
200 कोटींचा 'रावडी राठोड', त्यातील अक्षय कुमारची मुलगी आठवतेय! ती सध्या काय करते ?