15,000 लोकांच्या गर्दीत रेखाचा कंट्रोल सुटला, अमिताभसोबत केलं असं काही; आजही होतेय चर्चा
- Published by:Minal Gurav
 
Last Updated:
Rekha and Amitabh Bachchan : अभिनेता अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअर्सचे अनेक किस्से इंडस्ट्रीत आजही चर्चेत आहेत. असाच एक किस्सा म्हणजे रेखाने 15,000 लोकांसमोर अमिताभसोबत असं काही केलं होतं की त्याची आजही चर्चा होतेय. 
advertisement
1/11

 बॉलिवूडमधील दोन सुपरहिट कलाकार ज्यांच्या अफेअर्सच्या कधीच थांबल्या नाहीत. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अधुऱ्या प्रेमाचा सिलसिला आणि त्यांचे किस्से आजही इंडस्ट्रीत चर्चेत आहेत.
advertisement
2/11
 अमिताभ आणि रेखा यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यांच्या इतकी परफेक्ट जोडी आजवर मोठ्या पडद्यावर पाहायला मिळालेली नाही असं म्हणतात.
advertisement
3/11
 अमिताभसोबत काम करणं ही रेखासाठी पर्वणी असायची. अमिताभकडून तिला भरपूर शिकायला मिळायचं, दोघांचं बोलणं, हसणं, खेळणं, गप्पा मारणं व्हायचं. कितीही कठीण सीन असला तरी अमिताभमुळे रेखा कम्फर्टेबल व्हायची.
advertisement
4/11
 रेखा आणि अमिताभ यांची खूप चांगली मैत्री होते. अमिताभ रेखाला कामासंदर्भात सल्लेही द्यायचे ज्यामुळे रेखाचं काम आणखी उत्तम व्हायचं. रेखाने आजवर तिच्या अनेक मुलाखतींमध्ये अमिताभ यांचं कौतुक केलं आहे.
advertisement
5/11
 अमिताभ आणि रेखाचा सर्वात गाजलेला सिनेमा म्हणजे 'सिलसिला'. पण सिनेमातील एका सीननंतर रेखाचा स्वत:वरचा कंट्रोल सुटला. 15,000 लोकांच्या गर्दीत तिने अमिताभ यांच्यासोबत असं काही केलं की सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हा प्रसंग वर्षानुवर्ष इंडस्ट्रीत चर्चेत आला.
advertisement
6/11
 ‘सिलसिला’ सिनेमात एक सीन होता ज्यात रेखाला अमिताभला आय हेट यू म्हणायचं होतं. सकाळी सकाळी प्रचंड गर्दीत हा सीन शूट करायचा होता. पण हा सीन आणि अमिताभला आय हेट यू म्हणायला रेखा तयार नव्हती.
advertisement
7/11
 रेखाला खूप दडपण आलं होतं. तिच्या काळजाचा ठोका चुकला होता. कारण तिच्या मनात अमिताभसाठी प्रचंड प्रेम होतं. तिच्या इमोशन्स तिला हे वाक्य बोलू देत नव्हत्या.
advertisement
8/11
 रेखा खूप अस्वस्थ आहे हे अमिताभच्या लक्षात आलं. त्यांनी तिला बोलावलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण शूटींगमधील हा प्रसंग रेखासाठी संस्मरणीय क्षण होता, असं रेखाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
advertisement
9/11
 अमिताभनी रेखाला शांत करण्यासाठी एक गोष्ट सांगितली. हॉलिवूड स्टार James Dean च्या शूटींगचा एक किस्सा सांगितला. डीनलाही एका सीनमध्ये असे डायलॉग बोलायला भीती वाटत होती.
advertisement
10/11
 अमिताभने रेखाला सांगितले, "हा फक्त अभिनय आहे, जास्त मनावर घेऊ नको." हे ऐकून रेखा हसली आणि तिची भीती नाहीशी झाली. तो सीन नीट पूर्ण केला. सीन संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.
advertisement
11/11
 सीन संपल्यानंतर रेखा भावूक झाली. तिने 15,000 लोकांसमोर अमिताभला जाऊन घट्ट मिठी मारली आणि ती ढसाढसा रडू लागली. अमिताभने तिला शांत केलं. रेखा एका मुलाखतीत म्हणाली होती, आय हेट यू म्हणणं माझ्यासाठी खूप अवघड होतं पण अमिताभनी सगळं काही सोपं केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
15,000 लोकांच्या गर्दीत रेखाचा कंट्रोल सुटला, अमिताभसोबत केलं असं काही; आजही होतेय चर्चा