'सायंकितसोबत रोमँटीक सीन असला की तो...' सेटवर काय घडायचं, रिंकूने स्वत:च सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rinku Rajguru on Romantic Scenes : अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आशा सिनेमात अभिनेता सायंकित कामत सोबत रोमँटीक सीन्स दिले आहेत. त्या सीनआधी काय व्हायचं याबाबत रिंकूने स्वत:च सांगितलं.
advertisement
1/8

अभिनेत्री रिंकू राजगुरूचा 'आशा' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात तिनं आशा वर्करची भूमिका साकारली आहे. रिंकूच्या करिअरमधील हा सगळ्यात महत्त्वाचा सिनेमा आहे. रिंकूच्या सैराटमधील आर्चीच्या इमेजला आशा ब्रेक करेन असं म्हटलं जात आहे.
advertisement
2/8
रिंकूसोबत आशा सिनेमात अभिनेता सायंकित कामत, उषा नाईक, सुहास शिरसाट, हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आशा वर्करच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा विषय विनोदी शैलीत मांडण्यात आला आहे. त्यामुळे त्यात मासालाही पाहायला मिळतो.
advertisement
3/8
रिंकूनं सिनेमात मालकी ही भूमिका साकारली आहे. तर तिचा नवऱ्याची भूमिका अभिनेता सायंकित कामत याने साकारली आहे. मालतीला नेहमीच सपोर्ट करणारं असं सायंकितचं पात्र आहे. जुन्या विचारांचे असलेले आई-वडिल आणि पुढारलेल्या विचारांची बायको यांच्यातील मेळ साधण्याचं काम त्याने उत्तमरित्या केलं आहे.
advertisement
4/8
आशा सिनेमात मालती आणि तिच्या नवऱ्याचे म्हणजेच रिंकू आणि सायंकित यांचे काही रोमँटीक सीन्सही पाहायला मिळतात. सिनेमाच्या ट्रेलरमध्येही त्याची छोटी झलक दाखवण्यात आली आहे.
advertisement
5/8
सिनेमात रिंकूसोबत रोमँटिक सीन करताना सायंकित मात्र घाबरला होता. एका मुलाखतीत बोलताना रिंकूने याबद्दल सांगितलं. रोमँटिक सीनच्या आधी काय व्हायचं हे रिंकूने सांगितलं.
advertisement
6/8
इट्स मज्जीशी बोलताना रिंकू म्हणाली, "तो खूप गुणी अभिनेता आहे आणि तो गुणी मुलगाही आहे. सीन करण्याआधी सर आम्हाला काही सांगायचे. आमचं व्यवस्थित बोलणं व्हायचं "
advertisement
7/8
"आमचे रोमँटीक सीन असायचे तेव्हा सायंकित येऊन सांगायचा की, सरांनी असं असं करायला सांगितलं आहे, तू कम्फर्ट आहेस ना, आपण हे करूया ना."
advertisement
8/8
रिंकू पुढे म्हणाली, "त्याच्यासोबत काम करताना ऑकवर्डनेस कुठेच येत नाही. मी खूप कम्फर्टने त्याच्यासोबत काम केलं. मला खूप मज्जा आली त्याच्यासोबत काम करताना."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सायंकितसोबत रोमँटीक सीन असला की तो...' सेटवर काय घडायचं, रिंकूने स्वत:च सांगितलं