TRENDING:

'आम्ही वेगळे झालो...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, 16 वर्षांच्या संसारानंतर पतीपासून विभक्त

Last Updated:
Famous Actor Divorce : प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट झाला आहे. 16 वर्षांचं नातं तुटलं आहे.
advertisement
1/7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, 16 वर्षांच्या संसारानंतर पतीपासून विभक्त
तनुश्री शंकर यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री आणि इन्फ्लुअंसर श्रीनंदा शंकर आणि गेव सतारवाला अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. 21 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा घटस्फोट झाला आहे. तसेच डिवोर्सची गोष्ट प्रायव्हेट ठेवण्याचा तिने चाहत्यांना सल्ला दिला आहे.
advertisement
2/7
श्रीनंदा शंकर यांनी ऑफिशियल स्टेटमेंट शेअर करत आपल्या वैवाहिक आयुष्यातील अडचणींवर भाष्य केलं आहे. श्रीनंदा आणि गेव यांचा 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर श्रीनंदा आणि गेव अधिकृतरित्या विभक्त झाले आहेत. एकमेकांच्या सहमतीने ते वेगळे झाले आहेत.
advertisement
3/7
श्रीनंदा शंकरने सोशल मीडियावर एक स्टेटमेंट शेअर केलं आहे. श्रीनंदाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,"मी आणि गेव अधिकृतरित्या विभक्त झालो आहोत. आमच्या घटस्फोटाच्या आधी अफवा पसरल्या होत्या. पण आम्हाला आमच्या घटस्फोटाची बातमी जाहीर करण्यासाठी काही वेळ हवा होता".
advertisement
4/7
श्रीनंदा शंकरने पुढे लिहिलं आहे,"आयुष्यात काही आपण कधीही कल्पना न केलेल्या गोष्टी घडतात. पण या गोष्टींचा आपण स्वीकार करायला हवा. यापुढे कंटेंट बनवणं मी कायम ठेवणार आहे. काहींना आमच्या जोडीचे व्हिडीओ पाहायला आवडायचे. पण ऑनलाइन गोष्टींद्वारे तुमच्यासमोर सत्य समोर येईल असं होत नाही. तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप-खूप आभार".
advertisement
5/7
श्रीनंदा शंकर आणि गेव सतारवाला सुरुवातीला 8 महिने एकमेकांचे चांगले मित्र होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. पुढे त्यांची चांगली मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
advertisement
6/7
श्रीनंदा शंकर आणि गेव सतारवाला लग्नाआधी पाच वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. त्याचवेळी त्यांचा साखरपुडा झाला. श्रीनंदा आणि गेव यांनी 2009 मध्ये थाटामाटात लग्न केलं. पण आता 16 वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
advertisement
7/7
श्रीनंदा शंकर एक अभिनेत्री, मॉडेल, डान्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. तनुश्री शंकर आणि आणि आनंद शंकर यांची ती मुलगी आहे. श्रीनंदाने कमी वयात अभिनय आणि डान्सिंग करिअरची सुरुवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'आम्ही वेगळे झालो...'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट, 16 वर्षांच्या संसारानंतर पतीपासून विभक्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल