TRENDING:

Year Ender: मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांत मोठी लगीनघाई, 2025 मध्ये जुळल्या साताजन्माच्या 16 जोड्या

Last Updated:
यंदाच्या लग्नसराईच्या काळात एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. आज आपण मराठी मनोरंजन विश्वातील अशा जोड्यांवर नजर टाकूया, ज्यांनी २०२५मध्ये आपल्या आयुष्यातील एक नवा प्रवास सुरू केला आहे.
advertisement
1/18
मराठी विश्वातील सर्वांत मोठी लगीनघाई, 2025 मध्ये जुळल्या साताजन्माच्या 16 जोड्या
२०२५ या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. मनोरंजन विश्वासाठीही हे वर्ष अनपेक्षित घडामोडींचे ठरले. या वर्षी अनेक दिग्गज कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, याच वर्षात अनेक सेलिब्रिटींना आपल्या आयुष्याचा जोडीदार भेटला.
advertisement
2/18
या लग्नसराईच्या काळात एकापाठोपाठ एक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले. आज आपण मराठी मनोरंजन विश्वातील अशा जोड्यांवर नजर टाकूया, ज्यांनी २०२५मध्ये आपल्या आयुष्यातील एक नवा प्रवास सुरू केला आहे.
advertisement
3/18
21 जानेवारी रोजी अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे लग्नबंधनात अडकले आहेत. 'राजा राणीची गं जोडी' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शिवानी सोनार आणि रंग माझा वेगळा फेम अंबर गणपुळे यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होत्या.
advertisement
4/18
'मन धागा धागा जोडते नवा' फेम अभिनेता अभिषेक रहाळकरने कृतिका कुलकर्णीसोबत गुपचूप लग्न उरकलं. २५ जानेवारीला त्याने सोशल मीडिया पोस्टमधून त्याच्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
advertisement
5/18
बिग बॉस मराठी ५ फेम कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरने 16 फेब्रुवारीला कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली. अंकिताचा नवरा कुणाल हा गायक, लेखक आणि संगीत दिग्दर्शक आहे. अनेक मराठी मालिकांसाठी त्याने काम केलं आहे.
advertisement
6/18
'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवी दळवी म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकरने बॉयफ्रेंड अक्षय घरतसोबत १६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली.
advertisement
7/18
सोशल मीडिया स्टार आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळीने 27 फेब्रुवारी रोजी तिचा लाँग टर्म बॉयफ्रेंड वृषांक कनालशी लग्न केले. जवळपास 11 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते.
advertisement
8/18
'बिग बॉस मराठी 4'चा विजेता लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकरचे लग्न 9 मे रोजी थाटामाटात पार पडले. त्याने त्याची गर्लफ्रेंड रमा म्हणजेच साधना कातकरसोबत लग्नगाठ बांधली. ते जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.
advertisement
9/18
पाणी सिनेमा फेम रुचा वैद्यने ९ जून रोजी यश किरकिरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. पाणी सिनेमातला रुचाचा सहकलाकार आदिनाथ कोठारे यानं देखील या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.
advertisement
10/18
'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतील अद्वैत चांदेकर म्हणजेच अभिनेता अक्षर कोठारीने २० जूनला गुपचूप लग्न उरकले. त्याने सारिका खासनिस हिच्याशी लग्न केले असून, ती त्याची बालपणीची मैत्रीण आहे.
advertisement
11/18
अभिनेता सारंग साठ्ये आणि त्याची लाँग टर्म गर्लफ्रेंड पॉला यांनी नुकतंच लग्न केलं. 28 ऑगस्ट रोजी पॉला आणि सारंग यांनी कॅनडामध्ये लग्न केलं. तब्बल 12 वर्ष लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर सारंग आणि पॉला यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
12/18
'लक्ष्मी विलास' मालिकेतील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव याने 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरबरोबर लग्न केले. १६ नोव्हेंबर रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
advertisement
13/18
मराठी बिग बॉसच्या सिझन 5 चा विजेता सूरज चव्हाण अखेर लग्नबंधनात अडकला. २९ नोव्हेंबरला सूरजचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. सूरजच्या लग्नाला शेकडो लोकांनी हजेरी लावल्याचे दिसले. यावेळी सूरजची मोठ्या थाटात वरात काढण्यात आली होती.
advertisement
14/18
2 डिसेंबर 2025 रोजी 'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाड हिनं उद्योगपती शंभुराज खुटवडशी लग्न केलंय. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड खुटवड घराण्याची सून झाली आहे.
advertisement
15/18
पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर २ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले आहेत. सोहमशी लग्न केल्यानंतर पूजा बांदेकरांच्या घराची सून बनली आहे. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस उलटल्यानंतरही त्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.
advertisement
16/18
४ डिसेंबरला अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली असून चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
17/18
५ डिसेंबरला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निमिष कुलकर्णीचा लग्नसोहळा पार पडला. त्याने कोमल भास्करशी लग्नगाठ बांधली. कोमल अनेक मालिकांची ती क्रिएटिव्ह हेड म्हणून जबाबदारी सांभाळते.
advertisement
18/18
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेनं घटस्फोटाच्या काही महिन्यातच अभिनेत्रीनं दुसरं लग्न केलं. शुभांगी सदावर्तेनं निर्माता सुमित म्हशीलकरसोबत ५ डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्न केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Year Ender: मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांत मोठी लगीनघाई, 2025 मध्ये जुळल्या साताजन्माच्या 16 जोड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल