TRENDING:

बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये! आर्ची पुन्हा थिएटर गाजवायला सज्ज, या दिवशी येतोय नवा सिनेमा

Last Updated:
Rinku Rajguru : रिंकू राजगुरू आता पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून थिएटर गाजवायला सज्ज आहे. येत्या 19 डिसेंबरला तिचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
1/7
आर्ची पुन्हा थिएटर गाजवायला सज्ज, या दिवशी येतोय नवा सिनेमा
रिंकू राजगुरू 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. त्यानंतर 'मन कस्तुरी रे','आठवा रंग प्रेमाचा','कागर','झुंड' आणि आणखी काही चित्रपटांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांवर छाप पाडली. आता तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
advertisement
2/7
रिंकू राजगुरूच्या आगामी 'आशा' या चित्रपटाने रिलीजआधीच आपली ताकद दाखवून दिली आहे. 61 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला तब्बल चार पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.
advertisement
3/7
'आशा'मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू.
advertisement
4/7
'आशा' या चित्रपटात रिंकू राजगुरू व्यतिरिक्त सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
advertisement
5/7
रिंकूने साकारलेली 'आशा' ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
advertisement
6/7
रिंकू राजगुरूच्या 'आशा'बद्दल दिग्दर्शक दीपक पाटील म्हणाले,"आशा’ हा चित्रपट फक्त आशा आरोग्य सेविकांचा नाहीये तर घर सांभाळून, घरासाठी घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक बाईचा आहे. तिच्या स्वप्नांचा, तिच्या जिद्दीचा आहे. सतत नवनवीन विषयांना उचलून धरणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ही वेगळ्या वाटेवरची वेगळी आणि अनोखी गोष्ट निश्चितच आवडेल, अशी खात्री आहे".
advertisement
7/7
'आशा' या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना कधीही न पाहिलेल्या दुनियेचं दर्शन घडणार आहे. त्यामुळे रिंकू राजगुरूच्या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आता तब्बल 30 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये! आर्ची पुन्हा थिएटर गाजवायला सज्ज, या दिवशी येतोय नवा सिनेमा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल