Rupali Bhosle : 'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट! रुपाली भोसले डबल रोलमध्ये, दुसरी 'ती' कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Rupali Bhosle Double Role : अभिनेत्री रुपाली भोसले लपंडाव मालिकेत डबल रोलमध्ये दिसणार आहे. ती साकारत असलेली ती दुसरी व्यक्ती कोण?
advertisement
1/10

स्टार प्रवाहवर लंपडाव ही नवी मालिका काही दिवसांआधीच रिलीज झाली. आई कुठे काय करते या मालिकेनंतर अभिनेत्री रुपाली भोसले पुन्हा एकदा व्हिलन बनून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत तिनं साकारलेली सरकार ही भूमिका देखील प्रेक्षकांना आवडली.
advertisement
2/10
दरम्यान लंपडाव या मालिकेत अभिनेत्री रुपाली देसाई डबल रोल करणार आहे. रुपालीच्या दोन वेगळ्या भुमिका आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेचे अपकमिंग एपिसोड इंट्रेस्टिंग असणार आहेत.
advertisement
3/10
लपंडाव मालिकेत सखी आणि कान्हाच्या लग्नाची धामधूम सुरु असतानाच एक महत्त्वाचं रहस्य उलगडणार आहे. सरकार अर्थात तेजस्विनी कामत ज्या व्यक्तीला गुपचूपपणे भेटते ती व्यक्ती नेमकी कोण? हे जाणून घ्यायची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे.
advertisement
4/10
ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून सरकारची जुळी बहीण आहे. तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन सख्या बहिणी. मात्र पैसा आणि सत्तेच्या लालसेपोटी मनस्विनीने 12 वर्षांपूर्वी आपली सख्खी बहीण तेजस्विनीला किडनॅप करुन तिची जागा घेतली.
advertisement
5/10
तेजस्विनीची जागा मनस्विनीने घेतली आणि सरकार बनून कामत ब्रॅण्डची अनभिषिक्त सम्राज्ञी झाली. त्यामुळे प्रेक्षकांना वाटत असलेली तेजस्विनी ही तेजस्विनी नसून ती मनस्विनी असल्याचा मोठा खुलासा मालिकेत होणार आहे.
advertisement
6/10
अभिनेत्री रुपाली भोसले तेजस्विनी आणि मनस्विनी या एकसारख्या दिसणाऱ्या दोन्ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. आयुष्यात पहिल्यांदा ती डबलरोल साकारणार आहे.
advertisement
7/10
या अनुभवाविषयी सांगताना रुपाली म्हणाली, "सरकार तिच्या मुलीशी म्हणजेच सखीशी अशी का वागते? ती कुणाला भेटते? तिचा मनसुबा नेमका काय आहे? हे आणि असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून सतावत होते. या साऱ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत."
advertisement
8/10
"तेजस्विनी ही तेजस्विनी नसून मनस्विनी असल्याचं सत्य उलगडणार आहे. तेजस्विनी बनून जगणारी मनस्विनी भावनाशून्य आहे. तिचं सगळं आयुष्य पैसा आणि सत्तेभोवती फिरतं. तर तेजस्विनी मात्र अत्यंत दयाळू आणि प्रेमळ."
advertisement
9/10
रुपाली पुढे म्हणाली, "मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की मनस्विनी आणि तेजस्विनी या एकसारख्या दिसणाऱ्या मात्र दोन वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली."
advertisement
10/10
"दोन्ही व्यक्तिरेखा खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे लूक आणि देहबोलीवर प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. थोडी कसरत होतेय, दोन्ही पात्र साकारताना कलाकार म्हणून मी माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतेय."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rupali Bhosle : 'लपंडाव' मालिकेत मोठा ट्विस्ट! रुपाली भोसले डबल रोलमध्ये, दुसरी 'ती' कोण?