TRENDING:
अवघ्या 5 व्या वर्षी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलेलं सदऱ्यावर लावलेलं गुलाब, कोण आहे हा मराठमोळा अभिनेता?
Last Updated:
Guess Who : या दिग्गज अभिनेत्याने आपल्या अभिनयाने हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से जाणून घेऊया.
advertisement
1/9
5 व्या वर्षी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलेलं सदऱ्यावर लावलेलं गुलाब
मुंबई: ‘कौन दिसा में लेके चला रे’, ‘बडे अच्छे लगते हैं’ ही गाणी ऐकली की एका चेहऱ्याची आठवण येते. तो चेहरा म्हणजे अभिनेते सचिन पिळगावकर.
advertisement
2/9
त्यांनी आपल्या अभिनयाने हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही खास किस्से जाणून घेऊया.
advertisement
3/9
सचिन पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी एका मराठी सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील शरद पिळगावकर एक चित्रपट निर्माते होते.
advertisement
4/9
वडिलांकडून अभिनयाचे धडे गिरवत सचिन यांनी अगदी लहान वयातच बाल कलाकार म्हणून कामाला सुरुवात केली.
advertisement
5/9
advertisement
6/9
सचिन यांनी 'गीत गाता चल', 'अखियों के झरोखों से', 'बालिका वधू', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
advertisement
7/9
कपिल शर्माच्या शोमध्ये त्यांनी एक खूप खास किस्सा सांगितला होता. ते म्हणाले, "जेव्हा मी ५ वर्षांचा होतो, तेव्हा मला अभिनयासाठी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता."
advertisement
8/9
त्याच कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील उपस्थित होते. नेहरू यांनी आपल्या सदऱ्यावर लावलेलं लाल गुलाब काढून सचिनला दिलं आणि पुढेही असंच उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
advertisement
9/9
सचिन पिळगांवकर यांनी १९८५ मध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकरांशी लग्न केलं. श्रिया पिळगांवकर ही त्यांची मुलगी आहे. श्रियानेही ‘मिर्झापूर’ सारख्या वेब सिरीजमध्ये काम करून आपली खास ओळख निर्माण केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अवघ्या 5 व्या वर्षी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, नेहरुंनी दिलेलं सदऱ्यावर लावलेलं गुलाब, कोण आहे हा मराठमोळा अभिनेता?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल