अभिनेते सचिन पिळगावकर यांना कसं पडलं 'महागुरू' हे नाव? त्यांनी स्वत:च सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sachin Pilgaonkar Mahaguru Name Truth : अनेक कार्यक्रमांमध्ये सचिन पिळगावकर यांची ओळख महागुरू म्हणून केली जाते. याच नावाने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं आहे. पण महागुरू हे नाव सचिन पिळगावकर यांना कसं मिळालं? आजवर हे कोणालाच माहिती नसेल.
advertisement
1/7

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर 60 हून अधिक वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय करणाऱ्या सचिन पिळगावकर यांनी मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये उल्लेखनीय काम केलं आहे. त्यांना ‘महागुरू’ म्हणून देखील ओळखतात, पण हे नाव कसं पडलं, याची खरी गोष्ट अनेकांना माहितीच नाही.
advertisement
2/7
सचिन पिळगावकर यांनी 'एकापेक्षा एक' या डान्स शोमध्ये मुख्य परीक्षक म्हणून काम केलं. या शोमध्ये त्यांना ‘महागुरू’ असं नाव दिलं गेलं होतं. तेव्हापासून त्यांना महागुरू म्हणून देखील ओळखलं जातं.
advertisement
3/7
अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची ओळख महागुरू म्हणून केली जाते. मात्र अलीकडच्या काळात या नावावरून त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
advertisement
4/7
या ट्रोलिंगवर उत्तर देत सचिन पिळगावकर यांनी स्वतः त्यांच्या या नावामागची स्टोरी सांगितली.तारांगणला दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी स्पष्ट केलं की, "महागुरू हे नाव मी स्वतः घेतलेलं नाही. ते झी मराठी वाहिनीनं दिलं होतं. मी स्वतः ते घेतलेलं नाही. कारण मी स्वतःला महागुरू समजतही नाही आणि मानतही नाही. मी जर स्वतःला काही समजत असेन तर ते कुटुंबप्रमुख मानतो."
advertisement
5/7
त्यांनी असंही सांगितलं की, "मी त्यांना म्हटलं की आपण हे नाव नको ठेवूया. पण त्यांनी मला पटवून दिलं की हेच नाव का. त्या डान्स शोमध्ये मुलांना डान्स शिकवणारे गुरू देखील असणार आहेत. मग ते पण गुरू आणि तुम्हीही गुरू. मग ते गुरू आहेत तर त्यांच्यावर वर तुम्ही, म्हणून तुम्ही महागुरू. म्हणून मुख्य परीक्षकासाठी ‘महागुरू’ हे नाव सुचवलं गेलं."
advertisement
6/7
"मी फक्त ते नाव स्वीकारलं, स्वतःहून मी कधीच असं काही म्हणालो नाही. मी स्वतःला म्हणताना नेहमी कुटुंबप्रमुख म्हटलेलं आहे आणि मी स्वतःला कुटुंबप्रमुखच मानतो."
advertisement
7/7
त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही यावर भाष्य करताना सांगितलं, "महागुरू ही कोणतीही पदवी नाही. हे नाव फक्त शोसाठी ठेवलं गेलं होतं. पण लोक त्यावरून अनावश्यक ट्रोल करतात."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिनेते सचिन पिळगावकर यांना कसं पडलं 'महागुरू' हे नाव? त्यांनी स्वत:च सांगितलं