Sachin Pilgaonkar : 'तिच्या चेहऱ्यापेक्षा सुंदर तिचे...', 'या' अभिनेत्रीला पाहून सचिन पिळगांवकर सगळंच विसरले
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Sachin Pilgaonkar : सचिन पिळगांवकर यांनी नुकतंच एका अशा आठवणीचा खुलासा केला आहे, जी ऐकून तुम्हालाही गंमत वाटेल आणि एका महान अभिनेत्रीच्या सौंदर्याची कल्पना येईल.
advertisement
1/7

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके कलाकार सचिन पिळगांवकर यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं आणि आजपर्यंत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
advertisement
2/7
त्यांच्या आयुष्यातले अनेक किस्से नेहमीच रंजक असतात. पण नुकतंच त्यांनी एका अशा आठवणीचा खुलासा केला आहे, जी ऐकून तुम्हालाही गंमत वाटेल आणि एका महान अभिनेत्रीच्या सौंदर्याची कल्पना येईल. ती आठवण आहे त्यांच्या आयुष्यातील पहिल्या ऑटोग्राफची!
advertisement
3/7
सचिन पिळगांवकरांनी एका मुलाखतीत सांगितलं, "मी खूप लहान होतो, साधारण ७ वर्षांचा असेन. त्यावेळी मी पहिल्यांदा स्वतः कुणाचा तरी ऑटोग्राफ घेतला. माझ्याकडे ऑटोग्राफ बुक नव्हतं, म्हणून मी अभ्यासाच्या वहीवरच ऑटोग्राफ घेतला." हा प्रसंग राजकमल स्टुडिओमध्ये घडला, जिथे शूटिंग सुरू होतं. सचिन टॅक्सीने तिथे पोहोचले.
advertisement
4/7
सचिन पुढे सांगतात, "आम्ही त्या अभिनेत्रीबरोबर कधी काम केलं नव्हतं, पण मी त्यांना मधू आंटी (मधुबाला) म्हणून हाक मारली आणि त्यांच्या दिशेने धावलो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं... मी हात पसरले... आणि मी जाऊन त्यांना मिठीच मारली!"
advertisement
5/7
सचिनने लगेच वही आणि पेन काढलं आणि मधुबालाला विचारलं, "मधू आंटी, एक मिनिट थांबा. मला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे!" मधुबाला थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, "माझा ऑटोग्राफ तुला हवा आहे?" आणि त्यांनी प्रेमाने सचिन यांना ऑटोग्राफ दिला.
advertisement
6/7
ऑटोग्राफ घेतल्यावर सचिनचं लक्ष नकळत त्यांच्या पायांकडे गेलं आणि ते क्षणभर थबकले. "त्या वेळी मी खाली पाहिलं आणि माझं लक्ष त्यांच्या पायांकडे गेलं. मला त्या बाईचे पाय दिसले. ती बाई जितकी सुंदर होती, त्याच्या १० पटीने त्या बाईचे पाय सुंदर होते! बापरे बाप... असे पाय मी आयुष्यात कधी बघितले नाहीत. इतके सुंदर तिचे पाय होते!"
advertisement
7/7
त्यानंतर ब्रेकमध्ये मधुबाला सचिनच्या शूटिंग सेटवर आल्या आणि ते दोघे एकत्र बसले. मधुबालाच्या पायांच्या सौंदर्याचं वर्णन करताना सचिन आजही हरवून जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sachin Pilgaonkar : 'तिच्या चेहऱ्यापेक्षा सुंदर तिचे...', 'या' अभिनेत्रीला पाहून सचिन पिळगांवकर सगळंच विसरले