TRENDING:

Sholay 50th Years : शोलेच्या 50 वर्षांनंतर सचिन पिळगावकरांनी उलगडला रामगढ़चा 'राज'! म्हणाले, 'झोपड्यांमध्ये AC, सोफा बेड...'

Last Updated:
Sachin Pilgaonkar 50th years of Sholey : शोले हा सिनेमा रिलीज होऊन आज 50 वर्ष झाली आहेत. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी 50 वर्षांनी शोलेच्या रामगढ़चं सिक्रेट सांगितलं.
advertisement
1/8
शोलेच्या 50 वर्षांनंतर सचिन पिळगावकरांनी उलगडला रामगढ़चा 'राज'! म्हणाले...
भारतीय चित्रपटसृष्टीतील काही कल्ट सिनेमाच्या यादीतीली एक सिनेमा म्हणजे शोले. सिनेमातील प्रत्येक सीन, डायलॉग आणि कॅरेक्टर्स आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
advertisement
2/8
15 ऑगस्ट 2025 रोजी 'शोले'ला प्रदर्शित होऊन 50 वर्षे पूर्ण झाली आहे. सिनेमाचं लोकेशन देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. मोठ्या दगडांवर उभा असलेला गब्बर कोणीच विसरू शकत नाही.
advertisement
3/8
शोले ज्या ठिकाणी शूट झाला ते ठिकाण पाहण्यासाठी आजही लोक तिथे जातात. जे गाव आणि झोपड्या दिसल्या त्या साध्या सुध्या झोपड्या नव्हत्या. त्यात एसी लावलेला होता, बसण्यासाठी आलिशान जागाही होती. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी ही माहिती दिली.
advertisement
4/8
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार सचिन पिळगावकर यांनी सांगितलं की, 'शोले'चं चित्रीकरण कर्नाटकातील म्हैसूर जवळील रामनगरम या ठिकाणी झाले. हे ठिकाण बंगळुरूपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे.
advertisement
5/8
संपूर्ण युनिट बंगळुरूमध्ये राहत असे आणि रोज सकाळी 5 वाजता शूटिंगसाठी निघत असे. तिथे पोहोचायला साधारण एक तास लागत असे.
advertisement
6/8
रामनगरम गावात मोठमोठे दगड आणि सुंदर नैसर्गिक परिसर होता. दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि कला दिग्दर्शकांनी तिथे एक काल्पनिक रामगढ गाव तयार केले. झोपड्या अगदी खरी गावातील घरांसारख्या दिसत होत्या, पण प्रत्यक्षात त्या चित्रिकरणासाठी खास तयार केलेल्या होत्या, असंही सचिन पिळगावकर यांनी सांगितलं.
advertisement
7/8
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, "त्या झोपड्या दिसायला साध्या होत्या पण आतून त्यामध्ये एसी, सोफा, बल्ब आणि सर्व सुविधा दिल्या होत्या. कलाकार आणि क्रू मेंबर्सना शूटिंगदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही सोय केली होती."
advertisement
8/8
'शोले' प्रदर्शित होऊन अर्धशतक उलटलं असलं तरी त्याची जादू आजही कायम आहे. जुन्या पिढीपासून ते आजच्या तरुणाईपर्यंत हा सिनेमा कायमच स्पेशल राहिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sholay 50th Years : शोलेच्या 50 वर्षांनंतर सचिन पिळगावकरांनी उलगडला रामगढ़चा 'राज'! म्हणाले, 'झोपड्यांमध्ये AC, सोफा बेड...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल