TRENDING:

'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीनं थाटात केलं लग्न, नवऱ्याचं आहे मराठी इंडस्ट्रीशी खास कनेक्शन

Last Updated:
अभिनेत्री कोमल कुंभारने 25 नोव्हेंबर रोजी लग्न केलं. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आहेत. कोमलच्या नवऱ्याचं मराठी इंडस्ट्रीशी खास कनेक्शन आहे.
advertisement
1/8
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीनं केलं लग्न, नवऱ्याचं इंडस्ट्रीशी खास कनेक्शन
काही दिवसांआधीच अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर आणि अभिनेता मेघन जाधव यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतील अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार हिने देखील लग्न केलं आहे. 
advertisement
2/8
अभिनेत्री कोमल कुंभार हिने 25 नोव्हेंबर रोजी लग्न केलं आहे. कोमलने तिच्या लाँग टर्म बॉयफ्रेंडबरोबर लग्नगाठ बांधली आहे. कोमलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
3/8
कोमलने मोठ्या थाटात लग्न केलं. तिच्या लग्नाचा लुक चाहत्यांनाही आवडला आहे. कोमलने लग्नात ग्रीन कलरची डिझाइनर साडी नेसली होती. तिचे दागिने आणि ज्वेलरीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं. तर लग्नासाठी कोमलने खास लाल रंगाची नऊवारी साडी नेसली होती. 
advertisement
4/8
कोमलचा नवरा आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कोमलच्या नवऱ्याचं मराठी इंडस्ट्रीशी खास कनेक्शन आहे. गोकुळ दशवंती असं कोमलच्या नवऱ्याचं नाव आहे. कोमल आणि गोकुळ अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते.
advertisement
5/8
2 वर्षांआधी कोमलच्या वाढदिवशी गोकुळने तिला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर तिने लग्नाला होकार दिला आणि आता दोघेही लग्नबंधनात अडकले आहेत.
advertisement
6/8
कोमलच्या लग्नाआधीच्या सगळ्या विधी देखील मोठ्या थाटात पार पडल्या. दोघांना एकत्र हळद लागली. हळदीसाठी कोमलने व्हाइट रंगाचा ड्रेस परिधान केला होता. दोघांचे हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
advertisement
7/8
गोकुळचं मराठी इंडस्ट्रीशी खास कनेक्शन आहे. गोकुळ हा मराठी सिनेसृष्टीत अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करतोय. दोघेही एकाच क्षेत्रात असून लग्नाच्या वेळी दोघे आनंदात दिसले.
advertisement
8/8
अभिनेत्री कोमल कुंभारच्या वर्कफ्रंटविषयी सांगायचं झाल्यास, तिची 'सहकुटुंब सहपरिवार' ही मालिका खूप गाजली. यात तिने साकारलेली अंजी प्रेक्षकांनी प्रचंड आवडली होती. 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेनंतर कोमल 'अबोली' मालिकेत दिसली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीनं थाटात केलं लग्न, नवऱ्याचं आहे मराठी इंडस्ट्रीशी खास कनेक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल