Rinku Rajguru : 'सैराटमध्ये जे कमावलं ते सगळं गमावलं', सुपरहॉट लुकमुळे रिंकू राजगुरू ट्रोल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
नेहमीच प्रेक्षकांच्या पंसतीस उतरणारी रिंकू राजगुरू ट्रोल झाली आहे. तिच्या एका लुकनं तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.
advertisement
1/9

अभिनेत्री रिंकू राजगुरूनं नुकतीच मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्सना हजेरी लावली होती. या शोमधील रिंकूच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधलं.
advertisement
2/9
रिंकूनं फिल्मफेअर अवॉर्डमध्ये घातलेल्या डिप लेक गाऊनमुळे ती चर्चेत आली आहे. तिचा हा लुक पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी तिच्या या बोल्ड लुकचं कौतुक केलं आहे.
advertisement
3/9
डिपनेक गाऊनमुळे रिंकूचं कौतुक करण्यापेक्षा तिच्यावर टिका करण्यांची संख्या जास्त आहे. रिंकू तिच्या या लुकमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.
advertisement
4/9
सैराट या सिनेमातून आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीला भेटली. सैराटमधील रिंकूच्या भुमिकेनं सर्वांची मनं जिंकली.
advertisement
5/9
रिंकूनं सैराटमध्ये सेट केलेली तिची इमेज आजपर्यंत कोणाला ब्रेक करता आलेली नाही. फार कमी अभिनेत्रींच्या वाट्याला रिंकू सारखं यश मिळतं.
advertisement
6/9
रिंकूनं तिला मिळालेलं यश आजवर टिकवून ठेवलं आहे. सैराटनंतर तिनं अनेक सिनेमांत काम केलं पण तिची रिंकू म्हणून असलेली इमेज प्रेक्षकांच्या मनातून जात नाही.
advertisement
7/9
त्यामुळे रिंकूला फिल्मफेअर अवॉर्डला बोल्ड लुकमध्ये पाहून तिच्या आर्चीच्या इमेजला धक्का बसला असं अनेकांनी म्हटलं आहे. तिला ट्रोल करत एका चाहत्यानं लिहिलंय, "तू साडीत छान दिसतेय. असे कपडे घालू नको".
advertisement
8/9
दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, "नाही शोभत तुला असे कपडे. अभिनयावर लक्ष दे". तर आणखी एका चाहत्यानं कमेंट करत म्हटलंय, "जे सैराट मधी कमवल ते सगळं घालवलं"
advertisement
9/9
तर दुसरीकडे एका चाहत्यानं "बॉलिवूडवाल्यांनी केलं तर भारी पण मराठीवाल्यांनी केलं तर चुक! वा वा", अशी कमेंट करत थेट रिंकूची बाजू घेतली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : 'सैराटमध्ये जे कमावलं ते सगळं गमावलं', सुपरहॉट लुकमुळे रिंकू राजगुरू ट्रोल