Salman Khan Case : सलमान खानवर पुन्हा एकदा कायदेशीर कारवाई, कोर्टाने पाठवली नोटीस, कारण ठरलं 4 लाखांचं केसर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan Case Controversy : नुकतंच सलमान खानवर कायदेशीर खटला दाखल करण्यात आला असून कोर्टाने त्याला नोटीस पाठवली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या.
advertisement
1/7

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याचं वादविवादांशी खूप जुनं नातं आहे. सातत्याने सलमान कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकतो. पुन्हा एकदा सलमान एका नव्या वादात सापडला आहे. मात्र यावेळी हे प्रकरण कोणत्याही सिनेमाशी संबंधित नाही. नुकतंच सलमान खानवर कायदेशीर खटला दाखल करण्यात आला असून कोर्टाने त्याला नोटीस पाठवली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?
advertisement
2/7
एका पान मसालाची जाहिरात केल्या प्रकरणी सलमान खानवर थेट नोटीस बजावण्यात आली आहे. सलमानने ज्या पान मसाला ब्रँडची जाहिरात केली, ती ग्राहकांची दिशाभूल करणारी आहे, असा थेट आरोप करत राजस्थानच्या कोटा ग्राहक न्यायालयाने अभिनेत्याला नोटीस बजावली आहे.
advertisement
3/7
या प्रकरणी याचिका दाखल करणारे राजस्थान उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील इंदर मोहन सिंह हनी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "सलमान खान कोट्यवधी लोकांसाठी आदर्श आहेत. जेव्हा ते एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतात, तेव्हा लोक विचार न करता त्यावर विश्वास ठेवतात. जगात अनेक मोठे स्टार्स कोल्ड्रिंकचीही जाहिरात करत नाहीत, पण आपल्याकडे स्टार्स पान मसालासारख्या हानिकारक उत्पादनांची जाहिरात करतात. त्यांनी तरुणांना चुकीच्या दिशेने नेऊ नये."
advertisement
4/7
संबंधित पान मसाला कंपनीने या उत्पादनात केसर असल्याचा दावा केला आहे. तक्रारकर्त्यानुसार, सलमानने ज्या कंपनीचा प्रचार केला, त्यांनी आपल्या उत्पादनाला 'केसर मिश्रित पान मसाला' म्हणून खोटा प्रचार केला.
advertisement
5/7
मोहन सिंह यांचा युक्तिवाद आहे की, केसरची किंमत जवळपास ४ लाख रुपये प्रति किलो इतकी महाग असते आणि इतकी मौल्यवान वस्तू ५ रुपये किंमत असलेल्या पाऊचमध्ये कशी असू शकते? कंपनीचा हा दावा स्पष्टपणे खोटा आणि फसवणूक करणारा आहे.
advertisement
6/7
कोटा ग्राहक न्यायालयाने या गंभीर तक्रारीची तात्काळ दखल घेतली असून न्यायालयाने अभिनेता सलमान खान आणि संबंधित पान मसाला कंपनी या दोघांनाही नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर २०२५ रोजी निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
7/7
अशा प्रकारच्या जाहिरातींमुळे तरुणांची दिशाभूल होते आणि समाजात चुकीचा संदेश जातो, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे. आता या कायदेशीर लढाईत सलमान खान काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Salman Khan Case : सलमान खानवर पुन्हा एकदा कायदेशीर कारवाई, कोर्टाने पाठवली नोटीस, कारण ठरलं 4 लाखांचं केसर