TRENDING:

Actor Love Story: क्लबमध्ये भेट, दारुच्या नशेत पडले प्रेमात; संजय कपूर-महीपची अशी सुरु झालेली लव्हस्टोरी

Last Updated:
Actor Love Story: संजय कपूर यांची लव्हस्टोरीही खूप चर्चेत राहिली. एखाद्या सिनेमापेक्षा अधिक फिल्मी यांची लव्हस्टोरी आहे.
advertisement
1/7
क्लबमध्ये भेट, दारुच्या नशेत पडले प्रेमात; संजय कपूर-महीपची लव्हस्टोरी
बॉलिवूड अभिनेता संजय कपूर यांनी 1995 साली 'प्रेम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री तब्बू होती. हा चित्रपट यशस्वी ठरला, पण त्यानंतर त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
advertisement
2/7
संजय यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले, पण ते कधीही यशस्वी स्टार बनू शकले नाहीत. एक काळ असा होता, जेव्हा त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळेनासे झाले. मात्र आता ते ओटीटीवर सक्रिय आहेत.
advertisement
3/7
संजय कपूर यांची लव्हस्टोरीही खूप चर्चेत राहिली. 1994 मध्ये संजय पहिल्यांदा महीपला भेटले आणि पहिल्याच भेटीत ते तिच्या प्रेमात पडले. त्यावेळी संजय बॉलिवूडमध्ये करिअर करत होते, तर महीप एक मॉडेल होती.
advertisement
4/7
संजय आणि महिप पहिल्यांदा मुंबईतील कुलाबा ताज येथील एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. जिथे महीप दारू पिऊन होती आणि चुकून ती संजयच्या कुटुंबातील सदस्यांना भेटली.
advertisement
5/7
संजय आणि महिपने नशेत वन-नाइट स्टँड केलं. महिपला वाटलं हे फक्त एका रात्रीसाठीच होतं मात्र संजयला महिप आवडली आणि त्याने तिला लग्नासाठी विचारलं. आज या जोडप्याला दोन मुले आहेत शनाया कपूर आणि जहान कपूर.
advertisement
6/7
संजय आणि महिपमध्ये 16 वर्षांचं अंतर आहे. महिप 16 वर्षांनी लहान आहे. महीप कपूर नेटफ्लिक्सवरील ‘फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमुळे घराघरात पोहोचली. या शोमध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल स्पष्टपणे बोललं.
advertisement
7/7
दरम्यान, लग्नानंतर महिपने अभिनय सोडला होता. अभिनय सोडल्यानंतर महीपने दागिने डिझाइनिंगमध्ये करिअर सुरू केलं. ती ‘सत्यानी फाइन ज्वेल्स’शी जोडली गेली आणि बॉलिवूडमधील मोठ्या स्टार्ससाठी दागिने डिझाइन केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actor Love Story: क्लबमध्ये भेट, दारुच्या नशेत पडले प्रेमात; संजय कपूर-महीपची अशी सुरु झालेली लव्हस्टोरी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल