TRENDING:

Shahrukh Khan Mannat : शाहरूखला वाढवायची आहे मन्नतची उंची! तेवढ्या पैशात वांद्र्यात येतील 20 घरं

Last Updated:
Shah Rukh Khan Mannat : अभिनेता शाहरूख खानचा मन्नत बंगला बाहेरून खूप आलिशान वाटतो. आतल्या साइडने तो आणखी अलिशान आहे असं म्हणतात. शाहरूखचा हाच बंगला आता आणखी आलिशान होणार आहे कारण शाहरूख त्याच्या मन्नतची उंची वाढवणार आहे. मन्नतची उंची वाढवण्यासाठी शाहरूखला किती खर्च येणार माहितीये? त्या खर्चात तुम्ही वांद्रे येथेच 20 घरं खरेदी करू शकता.
advertisement
1/8
शाहरूखला वाढवायची आहे मन्नतची उंची! तेवढ्या पैशात वांद्र्यात येतील 20 घरं
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचं नाव घेतलं की त्याचे दमदार सिनेमे आणि त्याचा आलिशान बंगला नेहमीच डोळ्यांसमोर येतो.  मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात मन्नत या अतिशय आलिशान बंगल्यामध्ये शाहरूख खान राहतो.
advertisement
2/8
या ड्रीम पॅलेसमध्ये तो पत्नी गौरी आणि तीन मुलं आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खानसोबत राहतो. शाहरुख खानचा मन्नत हा बंगला खूपच भव्य आहे. त्याचा बंगला पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येत असतात.
advertisement
3/8
शाहरूखचा हाच आलिशान बंगला आणि आणखी आलिशान होणार आहे. शाहरूख आणि त्याची पत्नी मन्नतची भव्यता आणखी वाढवण्याच्या तयारीत आहेत. याबाबत किंग खानची पत्नी गौरीनेही संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे.
advertisement
4/8
मन्नतला अधिक आलिशान बनवण्याच्या तयारीत असलेल्या शाहरुख खानची पत्नी गौरी खानने गेल्या महिन्यात MCZMA म्हणजेच महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडे अर्ज दिला होता. MCZMA ने 10 आणि 11 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत या अर्जाचा त्यांच्या अजेंड्यामध्ये समावेश केला होता.
advertisement
5/8
शाहरुख खानला मन्नत 8 मजली बनवायची आहे मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला मन्नतच्या वर आणखी दोन मजले बांधायचे आहेत.
advertisement
6/8
सध्या मन्नत ही 6 मजली इमारत आहे. त्यावर सातवा आणि आठवा मजला बांधायचा आहे. यासाठी अर्ज करण्यात आला आहे. मन्नतची उंची वाढवण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
advertisement
7/8
मन्नत ही वास्तू 1914 मध्ये बांधलेले हेरिटेज साइट आहे. तब्बल 2091.38 स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर बांधली  गेली आहे. ज्यामध्ये एक आधुनिक सहा मजली इमारत देखील आहे, जी सध्या कुटुंबाच्या राहण्यासाठी वापरली जात आहे.
advertisement
8/8
परंतु खान कुटुंबाला ते दोन मजले कसे वापरायचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shahrukh Khan Mannat : शाहरूखला वाढवायची आहे मन्नतची उंची! तेवढ्या पैशात वांद्र्यात येतील 20 घरं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल