गौरीसमोर शाहरुख-प्रियांकाने केलेला खुल्लमखुल्ला रोमान्स, अशी होती किंग खानच्या बायकोची रिअँक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shahrukh Khan - Priyanka Chopra : शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राचं अफेअर आजही हॉट टॉपिक आहे. दोघांच्या अफेअरच्या अफवांमुळे गौरी अस्वस्थ झाली होती. दोघांच्या खुल्लम खुल्ला रोमान्सवर गौरीनं दिलेल्या रिअँक्शन आजही चर्चेत आहे.
advertisement
1/9

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख त्याच्या फिल्ममुळे कायम चर्चेत राहिला आहे. रोमान्सचा राजा मानल्या जाणाऱ्या शाहरुखच्या आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले ज्याला त्याने धीराने तोंड दिलं.
advertisement
2/9
आज एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे शाहरुख आणि गौरी यांचं नात्यात अस्थिरता आली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्रा त्यांच्या नात्यातील मिठाचा खडा ठरली होती. प्रियांका आणि शाहरुख यांचं प्रकरण आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे.
advertisement
3/9
2006 मध्ये त्यांनी "डॉन" सिनेमात एकत्र काम केलं आणि त्यांची मैत्री झाली. दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री जबरदस्त रंगली होती. पण त्यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
4/9
असं म्हणतात की 'डॉन 2' नंतर शाहरुख आणि प्रियांका यांच्यातील जवळीक वाढली होती. दोघे एकमेकांचे मित्र होते. दोघे अनेकदा पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यांच्या वाढत्या मैत्रीमुळे अफेअर्सच्या अफवा पसरल्या. शाहरुखने नेहमीच पीसीला चांगली मैत्रीण म्हटलं होतं. पण लोक त्यांच्या नात्याबद्दल कायमच अनिश्चित होते.
advertisement
5/9
शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअर्सच्या चर्चांनी इकडे गौरी मात्र प्रचंड अस्वस्थ होऊ लागली होती. एका अवॉर्ड शोमध्ये प्रियांका आणि शाहरुख मिठी मारतात आणि हे पाहून गौरी प्रचंड अनकम्फर्टेबल होते. हा व्हिडीओ आजही व्हायरल होतो.
advertisement
6/9
शाहरुख खानने इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केले असले तरी, त्याची पत्नी गौरी खानला कधीही असुरक्षित वाटले नाही. ही पहिलीच वेळ होती जेव्हा गौरीची रात्रीची झोप उडाली.
advertisement
7/9
2021 मध्ये शाहरुखने प्रियांकाला वैयक्तिकरित्या करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीत आमंत्रित केलं होतं. प्रियांका आली आणि शाहरुखने दिलेल्या रिअँक्शनवर गौरी चांगलीच संतापली होती. तिने सगळ्यांसमोर प्रियांकाचा पाणउतारा केला.
advertisement
8/9
शाहरुख आणि प्रियांकाच्या अफेअरच्या अफवांनी अस्वस्थ झालेल्या गौरीने शाहरुखला प्रियांकासोबत कोणताही चित्रपट साइन करू नये असे सांगितलं होतं.
advertisement
9/9
दरम्यान शाहरुख खानने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. तो म्हणाला की, "माझ्यासाठी सर्वात त्रासदायक गोष्ट ही आहे की माझ्याबरोबर काम करणाऱ्या एका स्त्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मी तिला जो आदर दाखवतो तो आदर दाखवला जात नाहीये."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गौरीसमोर शाहरुख-प्रियांकाने केलेला खुल्लमखुल्ला रोमान्स, अशी होती किंग खानच्या बायकोची रिअँक्शन