Sharvari Wagh: 'तो क्षण आलाच...' शर्वरी वाघचा खास गणेशोत्सव, थेट पोहोचली गावी; शेअर केले PHOTO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Sharvari Wagh: गणेश चतुर्थी म्हटलं की प्रत्येक घरात उत्साह, आनंद आणि भक्तीचं वातावरण पसरतं. अनेकांच्या घरी गणेशाचं आगमन होतं.
advertisement
1/7

गणेश चतुर्थी म्हटलं की प्रत्येक घरात उत्साह, आनंद आणि भक्तीचं वातावरण पसरतं. अनेकांच्या घरी गणेशाचं आगमन होतं. त्यामुळे सर्वत्र जल्लोषाचं वातावरण पहायला मिळतं. अशातच अभिनेत्री शर्वरी वाघचं आणि गणेशोत्सवाचं खूप खास नातं आहे.
advertisement
2/7
बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघसाठी गणेशासोबतचं खूप खास नातं आहे. त्यामुळे ती प्रत्येक वर्षा गणेश चतुर्थीला तिच्या मूळ गावी मोरगावला जाते. यंदाही ती गणेशाच्या आगमनासाठी गावी गेली आहे.
advertisement
3/7
शर्वरी वाघ सध्या तिच्या मूळ गावी मोरगाव (महाराष्ट्र) येथे गणेशोत्सव साजरा करत आहे. शहरात जरी ग्लॅमरची चमक असली तरी शर्वरी दरवर्षी गणेश चतुर्थीला गावाकडे धाव घेते. कुटुंबासोबत गणपतीची स्थापना करून ती हा सण अत्यंत साधेपणाने आणि भक्तिभावाने साजरा करते.
advertisement
4/7
या वर्षीही तिने सोशल मीडियावर काही खास झलक शेअर केल्या आहेत. आईच्या मांडीवर डोकं ठेवून केलेली तिची एक पोस्ट चाहत्यांच्या मनाला भावली. दरवर्षी शर्वरी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असते जेणेकरुन ती गावी जाऊन कुटुंबासोबत गणेशोत्सव सादरा करेन.
advertisement
5/7
शर्वरीने लिहिलं, “गणपती बाप्पा मोरया. गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा! तुमचे दिवसही प्रेम, हास्य आणि मोदकांनी गोड होवोत.” शर्वरीने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताच सोशल मीडियावर कमेंट आणि लाइक्सचा पाऊस झाला.
advertisement
6/7
गेल्या वर्षी शर्वरीने 35 वर्षं जुनी कांजीवरम साडी नेसून चाहत्यांचे लक्ष वेधले होते. ही साडी तिच्या आजीकडून आईकडे आणि नंतर तिच्याकडे आली. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं होतं, “हा सण माझ्यासाठी खूप खास आहे. या साडीमुळे आजीचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत.” यंदाही तिने पारंपरिक पोशाख घालून बाप्पाची पूजा केली आणि गावातील वातावरणात सामावून घेतलं.
advertisement
7/7
दरम्यान, शर्वरीने ‘बंटी और बबली 2’ मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खान आणि पंकज त्रिपाठी यांच्यासोबत तिने काम केलं. अलीकडेच आलेल्या ‘मुंज्या’ चित्रपटाने तिला मोठं यश दिलं. प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sharvari Wagh: 'तो क्षण आलाच...' शर्वरी वाघचा खास गणेशोत्सव, थेट पोहोचली गावी; शेअर केले PHOTO