TRENDING:

आयुष्यभर प्रेम केलं, त्याच्या मृत्यूदिनीच घेतला अखेरचा श्वास, सुलक्षणा पंडित यांच्या लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट!

Last Updated:
Sulaksha Pandit Death : ज्या अभिनेत्यावर सुलक्षणा पंडित यांनी आयुष्यभर मनापासून प्रेम केले, त्याच अभिनेत्याच्या मृत्यूच्या तारखेलाच सुलक्षणा पंडित यांनीही अखेरचा श्वास घेतला.
advertisement
1/8
Sulakshana Pandit : आयुष्यभर प्रेम केलं, त्याच्या मृत्यूदिनीच घेतला अखेरचा श्वास
मुंबई: एकेकाळच्या सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे ६ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. सिनेसृष्टीत आपल्या मधुर आवाजासाठी आणि दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुलक्षणा पंडित यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ अत्यंत एकाकी आणि भावनिक होता.
advertisement
2/8
अशातच त्यांच्या निधनानंतर एका अशा विचित्र योगायोगाची चर्चा सुरू झाली आहे, ज्यामुळे चाहतेही थक्क झाले आहेत. ज्या अभिनेत्यावर सुलक्षणा पंडित यांनी आयुष्यभर मनापासून प्रेम केले, त्याच अभिनेत्याच्या मृत्यूच्या तारखेलाच (६ नोव्हेंबर) सुलक्षणा पंडित यांनीही अखेरचा श्वास घेतला.
advertisement
3/8
हे दिग्गज अभिनेते होते संजीव कुमार. सुलक्षणा पंडित आणि संजीव कुमार यांनी १९७५ मध्ये आलेल्या 'उलझन' या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच काळात सुलक्षणा यांना संजीव कुमार यांच्यावर जीवापाड प्रेम जडले आणि त्यांनी अभिनेत्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
advertisement
4/8
संजीव कुमार यांनी सुलक्षणा यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यांनी सुलक्षणा यांना सांगितले की, त्यांना हृदयविकार आहे आणि त्यांच्याकडे आयुष्य जगण्यासाठी फार कमी वेळ आहे.
advertisement
5/8
लेखक हनीफ जावेरी यांच्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, संजीव कुमार यांचे सुलक्षणा यांच्यासोबत कोणतेही वैयक्तिक नाते नव्हते. सुलक्षणा यांनी त्यांना मंदिरात नेऊन लग्न करण्याची गळ घातली होती, पण संजीव कुमार त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले.
advertisement
6/8
संजीव कुमार यांचे निधन ६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले आणि नेमक्या त्याच तारखेला ४० वर्षांनंतर सुलक्षणा पंडित यांनीही जगाचा निरोप घेतला. संजीव कुमार यांच्या निधनानंतर आणि त्यानंतर लगेचच आपल्या आईचे निधन झाल्यानंतर सुलक्षणा पंडित यांना मोठा मानसिक धक्का बसला होता.
advertisement
7/8
'मुंबई मिरर'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत सुलक्षणा पंडित यांनी सांगितले होते, "मला चित्रपट किंवा गाण्याचे काम मिळाले नाही. मग संजीव कुमार गेले आणि त्याच वेळी माझी आईही गेली. या दोन्ही घटनांनी मला आतून तोडून टाकले. माझ्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आणि मी खूप काळ मानसिक त्रासात होते."
advertisement
8/8
आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या समस्यांमुळे त्या हळूहळू ग्लॅमर जगापासून दूर गेल्या. नंतरच्या काळात त्या त्यांची बहीण विजयता पंडित आणि संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. शेवटच्या काळात कुटुंबाचा आधार मिळाल्याने त्या सकारात्मक झाल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आयुष्यभर प्रेम केलं, त्याच्या मृत्यूदिनीच घेतला अखेरचा श्वास, सुलक्षणा पंडित यांच्या लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल