TRENDING:

Guess Who : देवानंदचा भाचा, CA ची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, ऑस्करेनेही घेतली दखल

Last Updated:
Bollywood Famous Director : एका प्रसिद्ध अभिनेता, निर्मात्याने CA ची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आज ते आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
advertisement
1/7
Guess Who : देवानंदचा भाचा, CA ची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री
'मिस्टर इंडिया','मासूम' आणि 'बँडिट क्वीन' सारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या शेखर कपूर यांनी आजवर एकापेक्षाएक चित्रपट दिले आहेत. आपल्या जबरदस्त कामगिरीने त्यांनी प्रेक्षकांवर विशेष छाप पाडली आहे. शेखर कपूर हे देवानंद यांचा भाचा असल्याचं खूप कमी लोकांना माहिती आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याआधी शेखर कपूर लंडनमध्ये CA होते.
advertisement
2/7
शेखर कपूर यांना सुरुवातीपासूनच अभिनेता व्हायचं होतं. त्यामुळे आई आणि आपल्या तीन भावा-बहिणींसोबत शेखर कपूर भारतात आले. हिंदी चित्रपटसृष्टीत शेखर कपूर यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे. अनेक उत्कृष्ट चित्रपट त्यांनी दिले आहेत. शेखर कपूर यांनी 'एलिजाबेथ' या ऑस्कर विजेत्या पीरियड फिल्मचंही दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाला सात कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं.
advertisement
3/7
देवानंद यांचा भाचा असूनही दिग्दर्शक शेखर कपूर यांना इंडस्ट्रीत खूप संघर्ष करावा लागला होता. अभिनेता म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. हॉलिवूडच्या 'द फोर फेदर्स' आणि 'एलिजाबेथ-l' सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे.
advertisement
4/7
शेखर कपूर यांचं देवानंद यांच्यासोबत खूप जवळचं नातं होतं. शेखर कपूर यांचे देवानंद मामा होते. सिनेमाची त्यांना लहानपणापासूनच आवड होती. पण प्रेक्षक त्यांना अभिनय कमी आणि दिग्दर्शक म्हणून जास्त पसंत करत होते.
advertisement
5/7
शेखर कपूर यांचं वैवाहिक आयुष्यदेखील खूप फिल्मी होतं. मेधा गुजराल या पहिल्या पत्नीसोबत त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 1994 मध्ये ते विभक्त झाले. मेधा गुजराल या माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांच्या भाची होत्या. शेखरपासून विभक्त झाल्यानंतर मेधा यांनी अनूप जलौटासोबत दुसरं लग्न केलं. अनूप जलौटा यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या.
advertisement
6/7
मेधासोबतचं नातं तुटल्यानंतर जवळपास 5 वर्षांनी शेखर यांनी आपल्यापेक्षा वयाने 30 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लग्न केलं. पण लग्नाच्या 8 वर्षांतच त्यांचं नातं तुटलं.
advertisement
7/7
शेखर कपूर यांचं नाव प्रीति झिंटा आणि अभिनेत्री शबाना आझमीसोबतही जोडलं गेलं होतं. शेखर आणि शबाना आझमी यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. 9 वर्ष त्यांचं अफेअर सुरू होतं असं म्हटलं जातं. पण सध्या तरी शेखर कपूर सिंगल आयुष्य जगत आहे. आज ते आपला 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : देवानंदचा भाचा, CA ची नोकरी सोडून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, ऑस्करेनेही घेतली दखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल