आता काय करतात CIDमधील कलाकार? अभिनय सोडून एक झालीये बिझनेसवुमन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो CID. आजही CID प्रेक्षक आवडीनं पाहतात.CID सत्य घटनेवर आधारीत क्राइम सीरिज होती. जी अनेक वर्ष टेलिव्हिजनवर सुरू होती. काही वर्षांआधी CID हा शो संपला. CIDमधील सगळी पात्र हिट झाली. एसीपी प्रद्युम्न ते दया पर्यंत सगळे कलाकार प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले. शो संपल्यानंतर ते कलाकार फार कुठे दिसले नाहीत. CIDमधील हे सुपरस्चटार सध्या काय करतात.
advertisement
1/7

CIDचे आयकॉनिक कॅरेक्टर म्हणजेच एसीपी प्रद्युम्न. अभिनेते शिवाजी साटम यांनी एसीपी प्रद्युम्नची भुमिका साकारली. शिवाजी साटम हे मराठी आणि हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते आहेत.
advertisement
2/7
अभिनेते दिनेश फडनीस यांनी फेडरिक्सची भुमिका साकारली होती. 2023मध्ये त्यांचं निधन झालं. CIDपुन्हा सुरू झालं तर त्यात फेडरिक्स नसतील.
advertisement
3/7
अभिनेता दयानंद चंद्रशेखर शेट्टी यानं दयाची भुमिका साकारली. CIDबंद झाल्यानंतरही दया अनेक शो आणि सिनेमात दिसला. आगामी सिंघम अगेनमध्ये तो दिसणार आहे.
advertisement
4/7
अभिनेते नरेंद्र गुप्ता यांनी डॉक्टर साळुंखेची भुमिका साकारली. CIDबंद झाल्यानंतर ते फॉरेंसिक सिनेमात दिसले. 2023 मध्ये त्यांचा मौका या धोका हा टेलिव्हिजन शो देखील सुरू होता.
advertisement
5/7
CIDमधील इंस्पेक्टर अभिजीत म्हणजेच अभिनेता आदित्य श्रीवास्तव नुकताच फिर आई हसीन दिलरुबा आणि IC 814 कांधार हायजॅक सिनेमात दिसला होता.
advertisement
6/7
CIDमधील डॉक्टर तारिका आता काम करत नाहीये. अभिनेत्री श्रद्धा मुसाळे ही एंटरप्रन्योर असून तिनं स्वत:चा फ्यूचर तैयारी हा स्टार्टअप सुरू केला आहे.
advertisement
7/7
अभिनेत्री अंश सईद हिनं CIDमध्ये इंस्पेक्टर पूर्वीची भुमिका साकारली हती. CIDबंद झाल्यानंतर ती नुकतीच घुडचढी या सिनेमात दिसली होती.