Sholay चा खरा क्लायमॅक्स 50 वर्षांनी पाहायला मिळणार, 'या' दिवशी 'शोले' पुन्हा रिलीज होणार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sholay Re-Release : तुम्ही आतापर्यंत पाहिलेला शोलेचा क्लायमॅक्स हा खरा नव्हता. शोलेचा खरा क्लायमॅक्स 50 वर्षांनी पाहायला मिळणार आहे. या दिवशी शोले री-रिलीज होतोय.
advertisement
1/8

शोलेच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा कल्ट क्लासिक शोले हा सिनेमा पुन्हा रिलीज होतोय. शोलेनं नुकतीच त्याची 50 वर्ष पूर्ण केली. पन्नास वर्षांनी सुद्धा शोलेची क्रेझ कमी झालेली नाही. 50 वर्षांनी पुन्हा रिलीज होणारा शोले हा एकमेव सिनेमा आहे. नुकतीच सिनेमाच्या टीमकडून ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीही शोलेचे फॅन असाल तर यंदाचा इअर एन्ड खूपच खास ठरणार आहे.
advertisement
2/8
री रिलीज होणारा शोले पाहायलाच लागणार आहे कारण 50 वर्षांआधी सेन्सॉर बोर्डाने सिनेमातून काढून टाकलेले सगळे सीन दाखवण्यात येणार आहे. 'शोले - द फायनल कट' या नावाने हा सिनेमा पुन्हा रिलीज होणार आहे.
advertisement
3/8
12 डिसेंबर 2025 रोजी शोले हा सिनेमा संपूर्ण देशात पुन्हा रिलीज होणार आहे. भारतातील तब्बल 1500 स्क्रीनवर हा सिनेमा दाखवण्यात येणाीर आहे. सिनेमाच्या पन्नासवर्ष पूर्ति निमित्तानं हा एक मोठा सेलिब्रेशनचा भाग ठरणार आहे.
advertisement
4/8
शोलेमधील अनेक सीन्सवर त्यावेळेस सेन्सॉरने कात्री लावली होती. आता 50 वर्षांनी पहिल्यांदाच प्रेक्षकांना शोलेचा ओरिजिनल, अनकट क्लायमॅक्स पाहता येणार आहे. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी मूळात जसा सिनेमा तयार केला होता तसाच्या तसा तो अनुभवता येणार आहे.
advertisement
5/8
दिग्दर्शक रमेश सिप्पी फिल्म्सने सांगितलं आहे की, आता हा सिनेमा 4K आणि Dolby 5.1मध्ये उत्कृष्टपणे रिस्टोर करण्यात आला आहे. म्हणूनच थिएटरमध्ये हा क्लासिक चित्रपट पाहण्याचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि रोमांचक असणार आहे.
advertisement
6/8
1975 मध्ये देशात आणीबाणीचा काळ सुरू होता. असं असताना सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचा क्लायमॅक्स खूप हिंसक असल्याचे सांगून तो बदलण्याचा आदेश दिला. त्यानंतर सिनेमाचा क्लायमॅक्स बदलण्यात आला होता. पण चित्रपट तज्ञ, क्रू मेंबर्सच्या आठवणी आणि जुन्या कागदपत्रांमध्ये नेहमीच हे सांगितले गेले की मूळ क्लायमॅक्स खूप तीव्र, भावनिक आणि प्रभावी होता.
advertisement
7/8
शोलेचं दिग्दर्शन रमेश सिप्पी यांनी केलं आहे. सिनेमाची स्टोरी सलीम-जावेद यांची आहे. अभिनेते धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन, सचिन पिळगांवकर, विजू खोटे अशी दिग्गज कलाकारांची फौज सिनेमात आहे.
advertisement
8/8
शोले सिनेमानं 50 वर्षांआधी 35 कोटींची कमाई केली होती. 50 वर्षांनी सिनेमा पुन्हा रिलीज झाल्यानंतर किती कोटींची कमाई करणार हा ही चर्चेचा विषय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sholay चा खरा क्लायमॅक्स 50 वर्षांनी पाहायला मिळणार, 'या' दिवशी 'शोले' पुन्हा रिलीज होणार