8 वर्षांनंतर स्वीटी गुप्ता परतणार! Mirzapur 4 कधी येणार? श्रिया पिळगावकरने फोटो शेअर करत दिलं मोठं सरप्राईज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
मिर्झापूर 4 कधी येणार याची सगळ्यांना उत्सुकता लागून होती. या सीझनमध्ये स्वीटी गुप्ता परतणार? श्रिया पिळगांवकरच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
1/8

ओटीटी </a>विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मिर्झापूर या वेब सीरिजने प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली आहे. गुड्डू पंडित, कालीन भैया, मुन्ना भैया यांच्यासोबतच या सीरिजमधील काही स्त्री पात्रांनी स्टोरीला एक नवं वळण दिलं. त्यापैकीच एक म्हणजे स्वीटी गुप्ता. गुड्डू पंडितची पत्नी." width="750" height="422" /> ओटीटी विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मिर्झापूर या वेब सीरिजने प्रेक्षकांवर वेगळीच छाप सोडली आहे. गुड्डू पंडित, कालीन भैया, मुन्ना भैया यांच्यासोबतच या सीरिजमधील काही स्त्री पात्रांनी स्टोरीला एक नवं वळण दिलं. त्यापैकीच एक म्हणजे स्वीटी गुप्ता. गुड्डू पंडितची पत्नी.
advertisement
2/8
अभिनेत्री श्रिया पिळगावकरने निरागस, शांत स्वभावाची स्वीटी गुप्ताची भूमिका साकारली होती. पहिल्या सीझनच्या शेवटी स्वीटीचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. श्रियाची या सीरिजमधील भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता तब्बल 8 वर्षांनंतर स्वीटी गुप्ता परत येणार असल्याचं संकेत मिळाले आहेत. चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
3/8
अभिनेत्री श्रिया पिळगांवकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं मिर्झापूरच्या टीमबरोबरचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो सेटवरचा आहे. तिनं पोस्ट शेअर करत लिहिलंय, "8 वर्षांनंतर… ओळखा पाहू, मृत्यूतून कोण परत आलंय. मिर्झापूर – द फिल्म. सध्या शूटिंग सुरू आहे. लवकरच भेटू."
advertisement
4/8
मिर्झापूर 4 येणार अशी घोषणा काही महिन्यांआधी करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात मिर्झापूर 4 येणार असं सांगितलं होतं. मात्र अद्याप त्याची कोणतीही घोषणा करण्यात आली नाहीये. श्रियाची पोस्ट वाचून मिर्झापूर 4 येणार आणि त्यात स्वीटू दिसणार असं सगळ्यांना वाटत आहे.
advertisement
5/8
पण प्रेक्षकांचा हा गोंधळ स्वत: श्रियाने दूर केला आहे. "गोंधळ करू नका. हा एक चित्रपट आहे. पार्ट 4 नाही", अशी कमेंट तिनं पोस्टच्या खाली केली आहे.
advertisement
6/8
यामुळे आता स्पष्ट झालं आहे की मिर्झापूर वेब सीरिजचा चौथा भाग नाही तर थेट 'मिर्झापूर - द फिल्म' येणार आहे. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरू असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही श्रेयाने संकेत दिले आहेत.
advertisement
7/8
मिर्झापूर ही सीरिज पहिल्यांदा 2018 मध्ये प्रदर्शित झाली होती. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर परिसरात घडणारी ही कथा राजकारण, गुन्हेगारी, सत्तासंघर्ष आणि सूडाभोवती फिरते. पहिल्या सीझननंतर दुसरा आणि तिसरा सीझनही प्रचंड गाजला. प्रत्येक सीझनमध्ये अनेक धक्कादायक वळणं पाहायला मिळाली.
advertisement
8/8
आता 'मिर्झापूर - द फिल्म'मधून स्वीटी गुप्ता कशा स्वरूपात परतणार, ही सर्वात मोठी उत्सुकता आहे. आता या चित्रपटातून स्वीटी गुप्ता नेमकी कशी परतते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
8 वर्षांनंतर स्वीटी गुप्ता परतणार! Mirzapur 4 कधी येणार? श्रिया पिळगावकरने फोटो शेअर करत दिलं मोठं सरप्राईज