V. Shantaram Biopic : व्हि. शांताराम यांच्यावर जीवनपट! प्रमुख भुमिकेत बॉलिवूडचा फेमस अभिनेता, नाव ऐकून बसेल शॉक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
V. Shantaram Biopic : चित्रपती व्हि. शांताराम यांच्या बायकोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली. या सिनेमात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शांताराम बापूंच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
advertisement
1/8

'झनक झनक पायल बाजे', 'अमृतमंथन', 'दो आंखें बारह हाथ', 'पिंजरा' असे एक ना अनेक दर्जेदार सिनेमे चित्रपटसृष्टीला देणारे चित्रपती व्ही शांताराम. संपूर्ण चित्रपटसृष्टी त्यांना शांताराम बापू म्हणून ओळखत होती. याचं शांताराम बापूंचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/8
भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे व्हि. शांताराम असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन जगले. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास या सिनेमातून उलगडण्यात येणार आहे.
advertisement
3/8
'व्ही. शांताराम' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. पोस्टरमध्येही व्ही.शांताराम यांच्या सिनेमांसारखचं वैभव, भव्यता पाहायला मिळतेय. सिनेमाचं पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
advertisement
4/8
मराठीच नाही तर हिंदीतही नवे प्रयोग करून ते सक्सेसफुल्ल करणाऱ्या शांताराम बापूंवर बायोपिक येतोय ही सिनेसृष्टीसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. पण शांताराम बापूंच्या भुमिकेत कोण दिसणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
advertisement
5/8
व्हि.शांताराम या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. व्हि.शांताराम यांच्या पोझमध्ये एक अभिनेता उभा आहे. हा अभिनेता कोण? तुम्ही ओळखलं?
advertisement
6/8
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सिद्धार्थच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील हा सिनेमा एक गेम चेंजर ठरणार आहे.
advertisement
7/8
सिद्धार्थ स्वत: देखील या सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहे. "उद्या 11.11 AM. माझ्या प्रवासातील आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा क्षण", अशी खास पोस्ट सिद्धार्थने शेअर केली होती. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर सिद्धार्थ प्रचंड खुश आहे. सिद्धार्थ चतुर्वेदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, त्याने आतापर्यंत 'धडक', 'फोन भूत', 'गेहराईया', 'बंटी बबली 2', 'खो गये हम कहा' सारख्या सिनेमात काम केलं आहे.
advertisement
8/8
'आणि… डॅा. काशिनाथ घाणेकर' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करत आहेत. 'व्हि.शांताराम' हा सिनेमा हिंदीत रिलीज होणार आहे. सिनेमा 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान सिनेमाची रिलीज डेट अद्याप सांगण्यात आलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
V. Shantaram Biopic : व्हि. शांताराम यांच्यावर जीवनपट! प्रमुख भुमिकेत बॉलिवूडचा फेमस अभिनेता, नाव ऐकून बसेल शॉक