परिणीती चोप्रानंतर प्रसिद्ध गायक दुसऱ्यांदा झाला बाबा, दिवाळीच्या मुहूर्तावर चिमुकल्याचं आगमन
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hardy Sandhu Welcomed Baby : परिणीती चोप्रानंतर प्रसिद्ध गायक दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे.
advertisement
1/7

गायक हार्डी संधू आणि त्यांची पत्नी जेनिथ सिद्धू यांनी आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. हार्डी संधू आणि जेनिथ सिद्धू दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत.
advertisement
2/7
'बिजली बिजली' आणि 'सोच' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हार्डी संधूच्या आयुष्यातील हा एक आनंदाचा क्षण आहे. आता ऐन दिवाळीत अभिनेत्याच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.
advertisement
3/7
21 ऑक्टोबर 2025 रोजी हार्डी संधूने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. आपल्या नवजात बाळाच्या छोट्या हातांची झलकही या फोटोत पाहायला मिळत आहे.
advertisement
4/7
हार्डी संधूने चाहत्यांसोबत फोटो शेअर करत लिहिलं आहे,"आमचा गोंडस आशीर्वाद आलाय. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा". हार्डी संधूवर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
advertisement
5/7
हार्डी संधूला मुलगा की मुलगी झाली आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण चाहत्यांकडून मुलगी झाली असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
6/7
हार्डी संधूच्या बाळाची झलक पाहण्याची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
advertisement
7/7
हार्डी संधूने 'टेकीला शॉट'च्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्णण केलं होतं. पुढे 'सोच','जोकर' या कलाकृतींच्या माध्यमातून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
परिणीती चोप्रानंतर प्रसिद्ध गायक दुसऱ्यांदा झाला बाबा, दिवाळीच्या मुहूर्तावर चिमुकल्याचं आगमन