मुंबई: दिवाळी सुरू झाली की बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह वाढतो. यावर्षी दिवाळीनंतर लगेच लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने मुली आणि महिलांचा कल ट्रेंडी आणि आरामदायी कपड्यांकडे जास्त वाढला आहे. पारंपरिक कपड्यांसोबतच हलके, मऊ आणि स्टायलिश कॉटनचे थ्री-पीस सेट सध्या लोकप्रिय आहेत.