ठाणे: हिवाळ्याच्या दिवसात निरोगी आणि तंदुरुस्त राहणे थोडे आव्हानात्मक असू शकते. थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे आणि इतर त्वचाविकारांचा धोकाही निर्माण होतो. पण काही टिप्स वापरून तुम्ही तुमची स्किन चांगली ठेवू शकता. ठाण्यातील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन साळुंखे यांनी लोकल18 सोबत बोलताना 5 टिप्स दिल्या आहेत. त्यांचा वापर केल्यास थंडीच्या दिवसांतही आपली त्वचा निरोगी आणि तजेलदार राहील.