मुंबई: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या रानडे रोडवरील डिसिल्वा शाळेच्या मैदानावर भरवण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या ग्राहक पेठेमध्ये देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या व्यापाऱ्यांनी आपली खास उत्पादने मांडली असून खरेदीसाठी ही एक अनोखी आणि संपन्न संधी ठरत आहे. या वस्तू तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकतात.