स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलच्या वयात अंतर किती? जाणून घ्या
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Smriti Mandhana Palash Muchhal Age Diffeence : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. जाणून घ्या स्मृती आणि पलाश यांच्या वयात किती अंतर आहे.
advertisement
1/7

क्रिकेटर स्मृती मंधाना आणि फेमस म्युझिक डिरेक्टर पलाश मुच्छल काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. 23 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार होता. पण काही कारणाने त्यांचं लग्न पुढे ढकलण्यात आलं. सध्या दोघांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.
advertisement
2/7
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल 6 वर्षांच्या डेटिंगनंतर 23 नोव्हेंबरला लग्न करणार होते. सांगलीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार होता. त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याचे म्हणजेच हळद, मेहंदी आणि संगीतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 2019 मध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. एका म्युझिक इव्हेंटमध्ये दोघांची पहिली भेट झाली होती. यावेळी एक कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून त्यांची भेट झाली होती.
advertisement
3/7
म्युझिक इव्हेंटमधील पलाशच्या गाण्यावर स्मृती फिदा झाली. स्मृती आणि पलाश यांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर पलाशने स्मृतीला प्रपोज केलं. रिलेशनच्या पाच वर्षांनी म्हणजेच 2024 मध्ये त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृतरित्या कबुली दिली.
advertisement
4/7
23 नोव्हेंबर 2025 रोजी स्मृती आणि पलाश लग्न करणार होते. त्यांच्या लग्नासाठी जगभरातील चाहते उत्सुक होते. पण स्मृतीच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर पलाशने स्मृतीला फसवलं असल्याच्या अनेक चर्चांना उधाण आलं. याबद्दल अधिकृतरित्या अद्याप काहीही समोर आलेलं नाही.
advertisement
5/7
स्मृती आणि पलाश यांच्या वयात किती अंतर आहे हे जाणून घेण्यास चाहते आता उत्सुक आहेत. स्मृतीचा जन्म 18 जुलै 1996 मध्ये झाला आहे. तर पलाशनचा जन्म 22 मे 1995 रोजी झाला आहे. पलाश आता 30 वर्षांचा असून स्मृती 29 वर्षांची आहे. त्यामुळे दोघांमध्ये फक्त एका वर्षाचं अंतर आहे.
advertisement
6/7
लग्नविधिंना सुरुवात होण्याआधी पलाशने स्मृतीला नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील स्टेडियममध्ये फिल्मी स्टाईल प्रपोज केलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी स्मृतीने लाल रंगाचा सुंदर वनपीस परिधान केला होता. तर पलाशने करड्या रंगाचं ब्लेझर घातलं होतं.
advertisement
7/7
पलाशची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्याची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी पलाशनला आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्यामुळे स्मृती आणि पलाशच्या लग्नाचं नक्की काय? हे जाणून घेण्यास चाहते आता उत्सुक आहेत.