TRENDING:

सोनाक्षी सिन्हा मालामाल! 61% फायद्यात विकला वांद्र्यातला 4bhk फ्लॅट, एका महिन्याचं भाडं ऐकून दातखिळी बसेल

Last Updated:
सोनाक्षीने या नवीन वर्षाच्या सुरुवातीला वांद्र्यातला तिचा चार बीएचके फ्लॅट विकला आहे. त्यातून तिने ६१ टक्के नफा कमावला आहे.
advertisement
1/9
सोनाक्षी सिन्हा मालामाल! 61% फायद्यात विकला वांद्र्यातला 4bhk फ्लॅट
अनेक दिवसांपासून चर्चेत नसलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्याचं कारण एखादा सिनेमा किंवा तिचं खासगी आयुष्य नसून तिने केलेला एक व्यवहार आहे.
advertisement
2/9
सोनाक्षीने तिचं घर विकलं आहे. तिने या नवीन वर्षाच्या सुरुवातीला वांद्र्यातला तिचा चार बीएचके फ्लॅट विकला आहे. त्यातून तिने ६१ टक्के नफा कमावला आहे.
advertisement
3/9
मुंबईतील मोठा कमर्शियल हब असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग, वांद्रे-वरळी सी लिंक, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नव्याने निर्माण झालेली मेट्रो रेल्वेची उपलब्धता या सगळ्या कारणांमुळे बहुतांश कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, मोठमोठे उद्योजक, राजकारणी, कलाकार वांद्रे परिसरात घर घ्यायला कायमच उत्सुक असतात.
advertisement
4/9
मुंबईत प्रवासात कमीत कमी वेळ जावा हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. अर्थातच एवढी कनेक्टिव्हिटी असल्यामुळे या भागातील फ्लॅटच्या किमती प्रचंड असतात. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी, रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण तसंच क्रिकेटर के. एल. राहुल-अथिया शेट्टी यांचीही या परिसरात घरं आहेत.
advertisement
5/9
सरकारी खरेदी-विक्री नोंदणी कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीने वांद्रा पश्चिम उपनगरातील ‘८१ ऑरेट’ या बिल्डिंगमधील ४.४८ एकर क्षेत्रफळाचा ४ बीएचके अपार्टमेंट २२.५० कोटी रुपयांना विकला आहे. ‘८१ ऑरेट’ हे एम. जे. शहा ग्रुपचं प्रोजेक्ट आहे.
advertisement
6/9
इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशनकडे (आयजीआर) नोंदवलेल्या कागदपत्रांचा हवाला देऊन स्क्वेअर यार्ड्जने याबद्दलची माहिती दिली आहे. सोनाक्षीने हा फ्लॅट मार्च २०२० ला १४ कोटी रुपयांना विकत घेतला होता. तो जानेवारी २०२५ मध्ये २२.५० कोटी रुपयांना विकला आहे. म्हणजे या व्यवहारातून सोनाक्षीला ६१ टक्के परतावा किंवा नफा मिळाला आहे. आयजीआरच्या रेकॉर्डनुसार याच बिल्डिंगमध्ये सोनाक्षीच्या मालकीचा आणखी एक फ्लॅट आहे.
advertisement
7/9
विकलेल्या फ्लॅटचा कार्पेट एरिया ३९१.२ sqm (अंदाजे ४,२११ sqft) आणि बिल्ट-अप एरिया ४३०.३२ sqm (अंदाजे ४,६३२ sqft) आहे. त्याचबरोबर तीन कार पार्किंगही आहेत. जानेवारी २०२५ मध्ये नोंद झालेल्या या व्यवहारात सरकारला स्टॅम्प ड्युटीपोटी १.३५ कोटी रुपये आणि रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणून ३० हजार रुपये देण्यात आल्याचं या कागदपत्रांत म्हटलं आहे.
advertisement
8/9
स्क्वेअर यार्ड्जच्या प्रोजेक्ट डेटा इंटेलिजन्सने दिलेल्या माहितीनुसार, ‘८१ ऑरेट’ या बिल्डिंगमधील फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचे फेब्रुवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान आठ व्यवहार झाले आहेत.
advertisement
9/9
आयजीआरमधल्या नोंदीनुसार या व्यवहारांमध्ये ७६ कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. सध्या या प्रोजेक्टमधील रिसेल ४ बीएचके फ्लॅटची किंमत ५१,६३६ per sq.ft. दराने ठरवली जाते. तसंच या फ्लॅटसाठी साधारणपणे दरमहा ८.५ लाख रुपये भाडं घेतलं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सोनाक्षी सिन्हा मालामाल! 61% फायद्यात विकला वांद्र्यातला 4bhk फ्लॅट, एका महिन्याचं भाडं ऐकून दातखिळी बसेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल