'अप्सरा' बनली 'मंजुळा'! मिस्ट्री-थ्रिलर सिनेमात सोनाली कुलकर्णीचे ठुमके, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा मिस्ट्री-थ्रिलर सिनेमात एक वेगळाच अंदाज पाहायला मिळणार आहे. 'अप्सरा' आणि 'मंजुळा' बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
advertisement
1/8

आपल्या दिलखेचक अदांनी भुरळ घालणारी 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे.
advertisement
2/8
सोनाली कुलकर्णीची अप्सरा ही इमेज प्रेक्षकांच्या मनात आजही आहे. पण हिच अप्सरा आता मंजुळा बसून मिस्ट्री-थ्रिलर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
advertisement
3/8
'सालबर्डी' या चित्रपटातील 'मंजुळा' या धमाकेदार गाण्यातून सोनालीचा मनमोहक आणि हटके अंदाज पहायला मिळणार आहे.
advertisement
4/8
'मंजुळा' या आयटम साँगची कोरिओग्राफी तितकीच आकर्षक असून, याची कोरिओग्राफी फुलवा खामकर यांनी केली आहे. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं, संगीतकार पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत असलेलं, हे गाणं आनंदी जोशी हिने गायलं आहे.
advertisement
5/8
'मंजुळा' या नव्या गाण्याबद्दल बोलताना सोनाली म्हणते, "हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. या गाण्यात एक वेगळीच एनर्जी आहे. फुलवाने सुद्धा या गाण्यातून काहीतरी नवीन आणि एंटरटेनिंग देण्याचा प्रयत्न केला असून ते प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल."
advertisement
6/8
सोनालीच्या या नव्या गाण्यामुळे 'सालबर्डी' चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. येत्या 17 एप्रिलला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
advertisement
7/8
महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या 'सालबर्डी' या गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा 'सालबर्डी' चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे.
advertisement
8/8
या चित्रपटात पूजा सावंत, शशांक शेंडे, ओंकार भोजने, भारत गणेशपुरे, अंशुमन विचारे, रोहित कोकाटे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, अनिल नगरकर, माधव अभ्यंकर, प्रवीण डाळिंबकर, अभय गिते, राजेंद्र सातार्डेकर, कोमल चौधरी आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'अप्सरा' बनली 'मंजुळा'! मिस्ट्री-थ्रिलर सिनेमात सोनाली कुलकर्णीचे ठुमके, PHOTO