TRENDING:

प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत! मशिदीत शूटिंग करणं पडलं महागात, FIR दाखल करण्याची मागणी

Last Updated:
Famous Actress Controversy : प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत आली आहे. मशिदीत शूटिंग करणं अभिनेत्रीला महागात पडलं आहे. अभिनेत्रीवर तक्रार दाखल करण्याची मागणी होत आहे.
advertisement
1/7
प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत! मशिदीत शूटिंग करणं पडलं महागात
'पिट स्यापा' हा चित्रपट अडचणीत आला आहे. सरहिंद येथील ऐतिहासिक मस्जिद 'भगत सदना कसाई' येथे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याची बाब समोर आली आहे. या घटनेवर पंजाबचे शाही इमाम मौलाना मोहम्मद उस्मान रहमानी लुधियानवी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी फतेहगड साहिब जिल्हा पोलिस ठाण्यात तात्काळ कारवाईची मागणी केली असून चित्रपटाची नायिका सोनम बाजवा, दिग्दर्शक, संपूर्ण टीम आणि संबंधित विभागाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
advertisement
2/7
शाही इमामांचे म्हणणे आहे की मस्जिदसारख्या पवित्र स्थळामध्ये शूटिंग करणे हे अनुचितच नव्हे तर धार्मिक श्रद्धेचा गंभीर अपमान आहे. त्यांनी सांगितले की 'भगत सदना कसाई' मस्जिदला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. भगत सधना यांना सिख आणि मुस्लिम दोन्ही धर्मसमुदायात मोठ्या आदराने पाहिले जाते. त्यांची वाणी श्री गुरु ग्रंथ साहिब मध्येही नोंदलेली आहे, ज्यामुळे ही मस्जिद आणखी पवित्र मानली जाते.
advertisement
3/7
शाही इमाम म्हणाले,"अशा धार्मिक स्थळी चित्रपटाचे शूटिंग करणे म्हणजे त्याची पवित्रता भंग करण्यासारखे आहे. शाही इमामांनी हे धर्माच्या आस्थेशी केलेले खिलवाड असल्याचे सांगत, अशा गोष्टी कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्षित करता येणार नाहीत असे म्हटले.
advertisement
4/7
शाही इमाम यांनी पुढे सांगितले की मस्जिदमध्ये चित्रपट शूट करण्याची परवानगी कधीही दिली जात नाही. तरीही चित्रपटाच्या टीमने येथे शूटिंग केले. योग्य परवानगी आणि संवेदनशीलतेची जाण नसताना एखाद्या धार्मिक स्थळी असे कसे करण्यात आले, हे समजण्यापलीकडचे आहे.
advertisement
5/7
शाही इमामांनी संबंधित परवाना विभागाविरुद्धही कारवाईची मागणी केली. कारण अशा प्रकरणांना थांबवणे हेच त्या विभागाचे काम आहे, परवानगी देणे नव्हे, असं त्यांचं मत आहे.
advertisement
6/7
"समाजात वाढत चाललेल्या अशा घटनांबाबत शाही इमाम यांनी चिंता व्यक्त केली. पूर्वी चित्रपटांना सामाजिक संदेश देण्याचे माध्यम मानले जात होते, परंतु आज अनेक चित्रपट निर्माते केवळ पैसा कमविण्यावर भर देत आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की जर चित्रपटाची नायिका आणि निर्मात्यांनी शहाणपणा दाखवला असता, तर ते मशिदीसारख्या संवेदनशील स्थळी शूटिंग करण्याचा निर्णय कधीच घेतला नसता, असे शाही इमाम म्हणाले.
advertisement
7/7
शाही इमामांनी पुढे सांगितले की धार्मिक आस्थेशी निगडित स्थळांची पवित्रता टिकवण्यासाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला विनंती केली की कोणताही विलंब न करता कठोर कारवाई करावी आणि कायद्यानुसार योग्य पावले उचलावीत. या घटनेनंतर स्थानिक समुदायातही नाराजी दिसून येत असून लोक अशा प्रकारच्या चित्रिकरणाविरुद्ध आवाज उठवत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत! मशिदीत शूटिंग करणं पडलं महागात, FIR दाखल करण्याची मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल