TRENDING:

रश्मिका-विजयने गुपचूप उरकला साखरपुडा? कशी सुरू झाली या जोडीची लव्ह स्टोरी? 'इथे' झाली पहिली भेट

Last Updated:
रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा असतानाच, त्यांनी अचानक गुपचूप साखरपुडा करून सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
1/8
रश्मिका-विजयने गुपचूप उरकला साखरपुडा? कशी सुरू झाली या जोडीची लव्ह स्टोरी?
मुंबई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि चर्चित जोडी म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या प्रेमसंबंधांची चर्चा जोरदार रंगली होती.
advertisement
2/8
हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी चर्चा असतानाच, त्यांनी अचानक गुपचूप साखरपुडा करून सगळ्यांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
3/8
विजय यांच्या घरी ३ ऑक्टोबरला अगदी जवळच्या लोकांमध्ये हा सोहळा पार पडला. दोघांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, पण त्यांच्या चाहत्यांसाठी मात्र ही बातमी आनंदाची पर्वणीच आहे.
advertisement
4/8
पण तुम्हाला माहीत आहे का, पडद्यावरची ही यशस्वी जोडी खऱ्या आयुष्यात पहिल्यांदा कधी भेटली?
advertisement
5/8
या दोघांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली २०१७ मध्ये. याच दरम्यान रश्मिका एका जुन्या नात्यातून नुकतीच बाहेर पडली होती. त्यांची पहिली भेट झाली ती त्यांच्या अत्यंत गाजलेल्या 'गीता गोविंदम्' या चित्रपटाच्या सेटवर. चित्रपटासाठी एकत्र काम करत असतानाच ते दोघे वैयक्तिकरित्या एकमेकांच्या खूप जवळ आले.
advertisement
6/8
'गीता गोविंदम्'नंतर त्यांची जोडी 'डिअर कॉम्रेड' सह इतर प्रोजेक्ट्समध्येही दिसली. कामासोबतच त्यांच्या नात्याची गाडीही वेगाने पुढे सरकू लागली. २०२२ पासून तर ते दोघे अनेकदा सुट्ट्यांवर एकत्र दिसू लागले आणि त्यांच्या प्रेमाच्या चर्चांना अधिकच जोर मिळाला.
advertisement
7/8
आता साखरपुडा झाल्यावर लवकरच त्यांच्या विवाहाची घोषणाही होईल, अशी आशा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रश्मिका आणि विजय हे दोघे फेब्रुवारी २०२६ मध्ये विवाहबंधनात अडकू शकतात.
advertisement
8/8
साऊथच्या चित्रपटसृष्टीतील हे पॉवर कपल आता कधी एकत्र कॅमेऱ्यासमोर येतं आणि आपल्या प्रेमाची अधिकृत कबुली देतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रश्मिका-विजयने गुपचूप उरकला साखरपुडा? कशी सुरू झाली या जोडीची लव्ह स्टोरी? 'इथे' झाली पहिली भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल