आऊटडोअर शूट अंगलट! फेमस स्टार्सना चूक महागात; शूटदरम्यान पोलीसांनी केलेली अटक
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bollywood Actors : सिनेमांचं आऊट डोअर शूटींग म्हणजे अनेकदा डोकेदुखी होऊ शकते. कलाकारांना आणि संपूर्ण टीमला विशेष काळजी घ्यावी लागते. अशाच एका सिनेमाच्या आऊट डोअर शूटींगच्या वेळेस दोन कलाकारांना अटक करण्यात आली होती. ते तुम्हाला कधीही गोळी घालू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नेमकं काय घडलं होतं?
advertisement
1/8

नई दिल्ली: सनी देओल की एक्शन थ्रिलर 'विश्वात्मा' हा किस्सा आहे सनी देओल आणि दिव्या भारतीच्या 1992 साली झालेल्या 'विश्वात्मा' सिनेमाच्या शूटींगवेळचा. सिनेमातील एक महत्त्वाची सीन केनियामध्ये शूट करण्यात आला होता. सिनेमाचे दिग्दर्शक राजीव राय यांनी अनेक वर्षांनी शूटींगवेळी घडलेला एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. जबरदस्त हिट थी. क्रिटिक्स ने भी इसे सराहा था. यह साल 1992 की 6वीं सबसे ज्यादा कलेक्शन करने वाली फिल्म है. इसने दिव्या भारती को स्टार बनाया और चंकी पांडे के करियर को नई उड़ान दी. अब फिल्म के डायरेक्टर राजीव राय ने इससे जुड़ा एक दिलचस्प किस्सा सुनाया है. (फोटो साभार: IMDb)
advertisement
2/8
सिनेमात चंकी पांडे, अमरीश पुरी, रझा मुराद आणि नसीरुद्दीन शाह सारखे दिग्गज कलाकार होते. अॅक्शन थ्रिलर असलेला हा सिनेमा प्रचंड हिट झाला होता. त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा हा सहावा सिनेमा होता. या सिनेमानं दिव्या भारतीला एका रात्रीत स्टार बनवलं.
advertisement
3/8
विश्वात्मामध्ये सनी देओल आणि नसीरुद्दीन शाह यांनी भूमिका केल्या होत्या. केनियामध्ये सिनेमाचा मोठा पार्ट शूट झाला होता. तिथे शूट झालेला हा पहिला भारतीय सिनेमा होता. नैरोबी आणि मोम्बासा या फेमस स्पॉटवर अनेक सीन्स शूट करण्यात आले होते. या शूटींगवेळी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
advertisement
4/8
राजीव राया यांनी द फ्रायडे टॉकीजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "परदेशात शूटिंग करण्याचे कोणतेही विशिष्ट कारण नव्हते. कथेत खलनायक पळून जातो असं दाखवण्यात आलं होतं. आफ्रिका माझ्यासाठी शूटिंगसाठी स्वस्त देश होता. शिवाय त्यात अ‍ॅक्शन सीन्सही होते. तिथे माझे काही कॉन्टॅक्टही होते. मी त्यांच्यासोबत कामही केले आणि मला त्यांच्याकडून खूप पाठिंबा मिळाला."
advertisement
5/8
राजीव राया यांनी कोणाचेही नाव न घेता पुढे स्पष्ट केले की नैरोबीमध्ये हालचालींबाबत विशिष्ट नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन कलाकारांना ताब्यात घेण्यात आले. ते पुढे म्हणाले, "तुम्ही रात्री नैरोबीमध्ये फिरू शकत नाही. तुम्हाला डॉलर्स, एक पैसाही घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. आम्ही परदेशात होतो." अभिनेत्याकडे खरेदीसाठी 10-15 डॉलर्स होते. जर तुम्ही तिथे पकडला गेलात तर ते तुम्हाला गोळी घालू शकत होते. तो कडक नियम असलेला देश होता.
advertisement
6/8
राजीव पुढे म्हणाले, "असे दोन कलाकार पहाटे 2 वाजता फिरत होते आणि त्यांना विनाकारण अटक करण्यात आली. तिथले वातावरणच तसं होतं. एक परदेशी भूमी, जिथे सर्वत्र सैन्य होतं एखाद्याला गोळी मारणं सामान्य होते."
advertisement
7/8
दिग्दर्शकाने त्यांच्या संपर्कांचा वापर करून विश्वात्माच्या कलाकारांना तुरुंगातून बाहेर काढले आणि रात्री बाहेर न जाण्याचा सल्ला दिला. ते पुढे म्हणाले, "माझ्या सह-निर्मात्यांचे खूप संपर्क होते. ते तिथले आदरणीय नागरिक होते आणि स्थानिक नेत्यांचे मित्र होते. त्यांनी स्टार्सना बाहेर काढले आणि आम्हाला कुठेही बाहेर जाऊ नका असे सांगितले."
advertisement
8/8
राजीव राय पुढे म्हणाले, "त्यांनी आम्हाला रस्त्यावर फिरू नका असे सांगितले, जेणेकरून आम्हाला गोळी लागणार नाही. ते लष्कराच्या नियमांसारखे होते. प्रत्येक देशाचे स्वतःचे राजकीय कायदे आणि संस्कृती असते. जेव्हा तुम्ही तिथे असता तेव्हा तुम्हाला त्यांचे पालन करावे लागते."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
आऊटडोअर शूट अंगलट! फेमस स्टार्सना चूक महागात; शूटदरम्यान पोलीसांनी केलेली अटक