TRENDING:

Dashavatar Collection : 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर गडगडाट! चौथ्या आठवड्यातही थिएटर्स हाऊसफुल

Last Updated:
Dashavatar Collection : बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांच्या गर्दीत मराठी सिनेमा 'दशावतार' ने आपली ताकद दाखवून दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या लाटेतही हा मराठी सिनेमा ठाम उभा राहिला आहे.
advertisement
1/7
'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर गडगडाट! चौथ्या आठवड्यातही थिएटर्स हाऊसफुल
मराठी सिनेमा </a>'दशावतार' ने आपली ताकद दाखवून दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या लाटेतही हा मराठी सिनेमा ठाम उभा राहिला आहे. 'दशावतार'चा चौथा आठवडा सुरू असूनही प्रेक्षकांची गर्दी कायम आहे. अजूनही दीडशे थिएटर्समध्ये आणि दोनशेहून अधिक शोमध्ये ‘दशावतार’ हाऊसफुल चालू आहे." width="1200" height="900" /> बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांच्या गर्दीत मराठी सिनेमा 'दशावतार' ने आपली ताकद दाखवून दिली आहे. हिंदी चित्रपटांच्या लाटेतही हा मराठी सिनेमा ठाम उभा राहिला आहे. 'दशावतार'चा चौथा आठवडा सुरू असूनही प्रेक्षकांची गर्दी कायम आहे. अजूनही दीडशे थिएटर्समध्ये आणि दोनशेहून अधिक शोमध्ये ‘दशावतार’ हाऊसफुल चालू आहे.
advertisement
2/7
ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा धो धो वर्षाव पाहिला. अमेरिकेत शंभरहून जास्त शो होत आहेत तर ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, आखाती देश येथे ‘दशावतार’ ने आपला झेंडा फडकवला आहे.
advertisement
3/7
मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्याच काळानंतर हे सळसळते चैतन्य लोकांना अनुभवायला मिळाले. दशावतार मुळे चित्रपट गृहांनी गणेशोत्सवानंतर लागलीच आपली दिवाळी साजरी केली. कोकणातील अनेक बंद चित्रपट गृहांची दारे ‘दशावतार’ ने पुन्हा उघडली. तर पूर्ण वर्षभराचे उत्पन्न कोकणातील चित्रपटगृहांनी एकट्या ‘दशावतार’ वर कमावले.
advertisement
4/7
काही खेड्यांमध्ये कंटेनर थिएटर 'दशावतार' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या दारात पोहोचले. या चित्रपटाने लोकांचा उदंड प्रतिसाद तर मिळवलाच पण मराठी चित्रपट, नाटक आणि सामाजिक वर्तुळात 'दशावतार' ची खूप प्रशंसा झाली. अशा रितीने मराठी चित्रपट उद्योगाला आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाला नवचैतन्य देण्याचे काम दशावतार चित्रपटाने केले आहे .
advertisement
5/7
इतकेच नव्हेतर ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा एक तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. कोकण आणि गोवा इथवरच मर्यादित असलेल्या दशावतारी नाटकांना पुण्या मुंबईतून खेळांची मागणी येत आहे.
advertisement
6/7
'दशावतार' चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर माया कमावली नाही तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे.
advertisement
7/7
Sacnilk, Koimoi च्या अंदाजनुसार, 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या दशावताने 22.12 कोटींची कमाई केली. वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन 26 कोटींहून अधिक आहे. बजेटच्या दुप्पट कमाई करुन हा सिनेमा सुपर हिट ठरला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dashavatar Collection : 'दशावतार'चा बॉक्स ऑफिसवर गडगडाट! चौथ्या आठवड्यातही थिएटर्स हाऊसफुल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल