बाबो...! एकदम झापूक झूपूक, सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलंत का! PHOTOS
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Suraj Chavan Pre Wedding Photoshoot : 'बिग बॉस' फेम सूरज चव्हाण लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. सूरजच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण येत्या 29 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या दोन दिवस आधी 'झापूक झूपूक' सूरज चव्हाणच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
2/7
सूरज चव्हाणच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. सासवड-जेजुरी या ठिकाणी 29 नोव्हेंबरला सूरजचा विवाहसोहळा पार पडणार आहे.
advertisement
3/7
सूरजच्या प्री-वेडिंग फोटोशूटने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुण्यातील Pixel City च्या सेटवर त्यांनी हे फोटोशूट केलं आहे. सूरजचा नेहमीपेक्षा हटके लूक खूपच कमाल आहे.
advertisement
4/7
सूरज आणि संजना गोफणे यांनी वेस्टर्न आऊटफिटमध्ये हे फोटोशूट केलं आहे. व्हाईट टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा सूट-बूट असा लुक सूरजने केला आहे. तर संजनाने लाल रंगाचा पार्टीवेअर गाऊन परिधान केला आहे.
advertisement
5/7
सूरज आणि संजनाचा डेनिम लूकदेखील लक्ष वेधणारा आहे. कारण या फोटोमध्ये सूरज संजनाला गुलाबाची फुलं देताना दिसत आहे.
advertisement
6/7
सूरजने खास पारंपारिक पेहरावातही फोटोशूट केलं आहे. संजनाने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केलाय. तर सूरज भाऊने पांढऱ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न सूट परिधान केला आहे.
advertisement
7/7
सूरज आणि संजना यांच्या लग्नाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. सूरज 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजून 11 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर लग्नबंधनात अडकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बाबो...! एकदम झापूक झूपूक, सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट पाहिलंत का! PHOTOS