'तारे जमीन पर' मधला ईशान 18 वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब; आता कुठे असतो, करतो काय?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Taare Zameen Par Darsheel Safary : आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटातील ईशानने सर्वांची मन जिंकून घेतली होती. आज 18 वर्षांनंतर हा मुलगा कसा दिसतो पाहा...
advertisement
1/7

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'तारे जमीन पर' या चित्रपटातील ईशानने सर्वांची मन जिंकून घेतली होती. त्याचा साधाभोळापणा, पुढे आलेले दोन दात आणि गोड हसूने सर्वांना थक्क केलं होतं. लहान वयातच आपल्या कामाने त्याने सर्वांना प्रभावित केलं होतं. दर्शील सफारी असं या मुलाचं नाव. चित्रपटात त्याने ईशान अवस्थी ही भूमिका साकारली होती.
advertisement
2/7
'तारे जमीन पर' या चित्रपटाच्या रिलीजला आता 18 वर्ष झाली आहे. छोटा ईशान आता पूर्णपणे बदलला आहे. काळासोबत त्याचं वयही वाढलं आहे.
advertisement
3/7
'तारे जमीन पर' रिलीज झाला तेव्हा दर्शील 10 वर्षांचा असेल. चित्रपटात साधाभोळा दिसणारा ईशान आता खऱ्या आयुष्यात मात्र प्रचंड फिटनेस फ्रीक झाला आहे.
advertisement
4/7
वय वाढण्यासोबत दर्शील आता हँडसम झाला आहे. दर्शीलचा कमाल लूक असूनही त्याला पुन्हा ब्रेक मिळाला नाही.
advertisement
5/7
दर्शीलला पहिल्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर तो 'झलक दिखला जा'मध्ये झळकला.
advertisement
6/7
बटरफ्लाई नामक एका कार्यक्रमाचाही तो भाग होता. 2017 मध्ये आलेल्या 'क्विकी'मध्ये तो मुख्य भूमिकेत होता. पण त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला.
advertisement
7/7
दर्शील सध्या एका चांगल्या प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच एखाद्या उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तारे जमीन पर' मधला ईशान 18 वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब; आता कुठे असतो, करतो काय?