TRENDING:

तनुश्री दत्ता या महिन्यात अडकणार लग्नबंधनात, म्हणाली,"लग्नाशिवाय प्रेग्नंट राहुन..."

Last Updated:
Tanushree Dutta : तनुश्री दत्ता अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असूनही चर्चेत आहे. अशातच आता अभिनेत्रीने लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं जाहीर केलं आहे.
advertisement
1/7
तनुश्री दत्ता या महिन्यात अडकणार लग्नबंधनात, म्हणाली,"लग्नाशिवाय प्रेग्नंट..."
तनुश्री दत्ता एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती. इमरान हाशमीसोबत 'आशिक बनाया आपने' या सिनेमातील अभिनयामुळे तिला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटानंतर ती इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ज आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. पण काही वादानंतर तनुश्रीने अनाचक इंडस्ट्रीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि आजही ती रुपेरी पडद्यापासून दूरच आहे.
advertisement
2/7
तनुश्री आता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच एका मुलाखतीत तनुश्री दत्ता लग्न आणि कुटुंबाबाबत स्पष्टपणे बोलताना दिसून आली आहे.
advertisement
3/7
पिंकविल्हाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री दत्ताने लग्न आणि कुटुंबाबद्दल भाष्य केलं आहे. लग्न करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न तनुश्रीला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेत्री म्हणाली,"हो. लग्न करायचं आहे". तनुश्रीला एका संताने सांगितलं आहे की, तिच्या नशिबात लग्न आणि मूल या दोन्ही गोष्टी आहेत.
advertisement
4/7
पिंकविल्हाला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री म्हणाली,"मला लग्न करायचं आहे. माझ्या नशीबातही आहे. मी कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते तिथे मला एक 90 वर्षांच्या साधू भेटल्या. त्या 40 वर्षांपासून मां तारा यांच्या साधिका आहेत".
advertisement
5/7
तनुश्री दत्ता म्हणाली,"त्या साधुंनी मला सांगितलं की मला एक मुलगा होईल. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की अजून माझं लग्नच झालेलं नाही. आधी मला लग्नासाठी आशीर्वाद द्या. कारण लग्नाशिवाय काही झालं तर मोठी अडचण होईल. म्हणूनच मी रिलेशनशिपपासूनही दूर आहे. मला वाटतं की मी अशाच व्यक्तीसोबत नात्यात राहावं जी लग्नासाठी तयार असेल. मला कोणतंही नातं गुंतागुंतीचं करायचं नाही".
advertisement
6/7
तनुश्री दत्ता पुढे म्हणाली,"माझं बोलणं ऐकूण त्या साधू म्हणाल्या,"अच्छा. लग्न झालेलं नाही. बरं, डिसेंबरमध्ये होईल तुझं लग्न. पण त्यांनी हे सांगितलं नाही की कोणत्या डिसेंबरमध्ये होईल. त्यांनी हेही सांगितलं की तुला मुलगा झाल्यावर त्याला घेऊन माझ्याकडे ये. मला भेटायचं आहे".
advertisement
7/7
तनुश्री दत्ता पुढे एका साईबाबा मंदिरात गेली. तिथे तिला एक टॅरो कार्ड रीडर भेटली. तिनेही तनुश्रीला एक मुलगा होणार असा अंदाज वर्तवला. याबाबत बोलताना तनुश्री म्हणते,"ती टॅरे कार्ड रीडर ख्रिश्चन होती. मला पाहताच ती म्हणाली,तू प्रेग्नंट आहेस का? कारण तुझ्या आसपास एक आत्मा आहे आणि तो मुलाच्या रुपात दिसतोय. ज्याच्यासोबत लग्न करायचं आहे. त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहा. कारण तू प्रेग्नंट होशील. मला लग्नाशिवाय प्रेग्नंट होऊन अडचणीत पडायचं नाही".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तनुश्री दत्ता या महिन्यात अडकणार लग्नबंधनात, म्हणाली,"लग्नाशिवाय प्रेग्नंट राहुन..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल