रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडे व मुंबईकडे जाणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन एक्स्प्रेस, तसेच इतर मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. पुणे–मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस 28 व 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत अंदाजे 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचणार आहे. तर 26, 28 आणि 29 नोव्हेंबर रोजी काही गाड्यांना ठराविक ठिकाणी थांबवून पुन्हा मार्गावर वळवण्याचे नियोजन केले आहे. पुणे–हसरगट्टा सुपरफास्ट, पुणे–हुबळीसह अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर पावर ब्लॉकचा परिणाम होणार आहे.
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–चेन्नई एक्स्प्रेस लोणावळा येथे एक तास थांबवणे आवश्यक ठरणार आहे. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस–मुडगाव एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस, कोकण मार्गावरील अनेक गाड्यांना 10 ते 25 मिनिटे अतिरिक्त वेळ लागू शकतो. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या 21 नोव्हेंबरच्या काही गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
या गाड्या धावणार उशिराने
28 आणि 29 नोव्हेंबर रोजी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.25 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पुणे- छत्रपती शिवाजी महाराज डेक्कन टर्मिनस एक्सप्रेस एक तास पंधरा मिनिटे, दौंड- इंदोर एक्सप्रेस एक तास, कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोयना एक्सप्रेस 40 मिनिटे, बेंगळुरू- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उद्यान एक्सप्रेस 30 मिनिटे, नागरकोईल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दीड तास, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चेन्नई एक्सप्रेस 10 मिनिटे नियमन करण्यात येईल.
दरम्यान, पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस आणि पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंद्रायणी एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचेल.






