HBD Tejashree Pradhan: 'तर मी लग्नाचा निर्णय घेईन!' तेजश्रीला 36 व्या वर्षी पुन्हा थाटायचाय संसार; असा हवा होणारा नवरा
- Published by:Nishigandha Kshirsagar
Last Updated:
Tejashree Pradhan Birthday : मराठी मालिकाविश्वातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्री सध्या स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतुन 'मुक्ता' या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिला या भूमिकेत प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. तेजश्री आज २ जून रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज त्यानिमित्त जाणून घेउया तिच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी.
advertisement
1/10

तेजश्री झी मराठीच्या 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहचली. तिची जान्हवी ही भूमिका तुफान लोकप्रिय झाली.
advertisement
2/10
तेजश्रीने त्यानंतर अग्गबाई सासूबाई आणि आता प्रेमाची गोष्ट या मालिकांतून तसंच चित्रपटातून देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली.
advertisement
3/10
तेजश्री तिच्या मालिका, चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली.
advertisement
4/10
तेजश्री 'होणार सून मी या घरची' या मालिकेचा को-स्टार शशांक केतकरच्या प्रेमात पडली आणि मालिका सुरु असतानाच दोघांनी लग्न केलं.
advertisement
5/10
मात्र त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. आता त्यांचा घटस्फोट होऊन 9 वर्ष उलटली आहेत.
advertisement
6/10
आता तेजश्रीला पुन्हा लग्न करायची इच्छा आहे. तिने एका मुलाखतीत याविषयी मौन सोडलं होतं.
advertisement
7/10
तेजश्री म्हणाली होती, 'एखाद्याच्या आयुष्यात चढउतार येतात तेव्हा आपण कोलमोडतो, थांबतो, ब्रेक घेतो. मी शेवटी स्वत:ला समजावलं की नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे. लोकांना असं वाटतं की, मी करिअरकडे जास्त लक्ष देते.'
advertisement
8/10
ती पुढे म्हणाली, 'अनेक जणांकडून मी माझ्याबाबत अशा पद्धतीची वाक्यही ऐकली आहेत. लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत. मला कुटुंब आवडतं. मला कुटुंब हवं आहे. मला लग्न करायचं आहे.'
advertisement
9/10
तेजश्री पुढे म्हणाली, 'लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या 24-25व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन.'
advertisement
10/10
तेजश्री तिला कसा मुलगा हवाय याविषयी बोलताना म्हणाली,'लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे. कारण मला बोलायला आवडतं. मी पार्टी करणारी मुलगी नाही, मला कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडतो.' असा खुलासा तिने केला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
HBD Tejashree Pradhan: 'तर मी लग्नाचा निर्णय घेईन!' तेजश्रीला 36 व्या वर्षी पुन्हा थाटायचाय संसार; असा हवा होणारा नवरा