Tejashri Pradhan Education : तेजश्री प्रधानचं शिक्षण किती झालंय? सतत देत असते मोटिवेशनचे डोस
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejashri Pradhan Education : अभिनेत्री तेजश्री प्रधानचे अनेक मोटिवेशनल व्हिडीओ व्हायरल होत असतात. तिच्या आजवरच्या मालिकांमध्येही फार समजूतदारपणे आणि प्रेमाने बोलताना दिसते. नेहमी मोटिवेशनल डोस देणाऱ्या तेजश्रीचं शिक्षण किती झालंय माहितीये?
advertisement
1/9

अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी टेलिव्हिजन आघाडीच्या नायिकांपैकी एक तेजश्री आहे. 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'लेक लाडकी ह्या घरची', 'घर श्रीमंताचं', 'लेक लाडकी ह्या घरची', 'अगं बाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' सारख्या मालिकेतून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/9
तेजश्री अभिनेत्री आहेत पण ती खूप छान बोलते देखील. तिच्या मुलाखतींमधील अनेक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तेजश्री अनेकदा मोडिवेशनल बोलताना दिसते. अनेकदा तिचे व्हिडीओ इन्स्टा स्टोरी, व्हॅट्स एप स्टेटसवर पाहायला मिळतात.
advertisement
3/9
तिच्या आजवरच्या मालिकांमध्येही ती फार समजूतदारपणे आणि प्रेमाने बोलताना दिसते. नेहमी मोटिवेशनल डोस देणाऱ्या तेजश्रीचं शिक्षण किती झालंय माहितीये?
advertisement
4/9
सुलेखा तळवळरला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तेजश्रीनं तिच्या शिक्षणाबद्दल सविस्तर सांगितलं होतं. तेजश्री म्हणाली, "NIIT चा एक कोर्स करून काही तरी स्पेशल करूया असं मला वाटलं. पण मला आयुष्यात कायम कॉउन्सिलर व्हायचं होतं. मी सायकोलॉजी घेतलं होतं. सायकोलॉजीमध्ये आधीपासून इंटेस्ट्रेट होता."
advertisement
5/9
"मला जनरलच लोकांना रिड करणं, त्यांचे माइंड्स रिड करणं त्यांना काहीतरी छान सांगणं हे आवडतं. मी चौदावी पर्यंत मी सायकोलॉजीच घेतलं होतं. मला कायम कॉउन्सिलरचं व्हायचं होतं."
advertisement
6/9
तेजश्री पुढे म्हणाली, "मी चौदावीपर्यंत सायकोलॉजीपण केलं. पण चौदावीमध्ये मला माझा पहिला ब्रेक मिळाला. सायकोलॉजीमध्ये तुम्हाला अटेंडन्स, प्रॅक्टिकल्स कम्पुलसरी अटेंड करावी लागतात."
advertisement
7/9
"तेव्हा मी विचार केला की, मला जर सायकोलॉजी करायचं आहे, कॉउन्सिलर व्हायचं आहे तर मी पुढे जाऊन बाहेरूनही ते करू शकते. म्हणून मी ग्रॅज्युएशन पॉलिटिकल सायन्समधून केलं कारण त्याचा अटेंडन्सचं टेन्शन नव्हतं. वझे केळकर कॉलेजची मी स्टुडेंट आहे."
advertisement
8/9
ह्या गोजिरवाण्या घरात ही तेजश्रीची पहिली मालिका होती. ती पुढे म्हणाली, "नंतर मला वाटलं की कॉउन्सिलर हे इनफ नाहीये. मला भाषांबद्दल प्रेम होतं. मी जर्मन शिकायला घेतलं. मी तीन लेव्हल जर्मनच्या केल्या. मला ट्रान्सलेटर व्हावसं वाटलं. असं मला खूप काही करायचं वाटलं."
advertisement
9/9
तेजश्रीने तिच्या ग्रॅज्युएशनसाठी घेतलेली सायकोलॉजीचं पुस्तकं तिच्याकडे अजूनही आहेत. 'ती पुस्तकं मी अजूनही वाचते, त्यावर माझा माझा अभ्यास सुरू असतो', असंही ती म्हणाली,
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan Education : तेजश्री प्रधानचं शिक्षण किती झालंय? सतत देत असते मोटिवेशनचे डोस