Tejashri Pradhan : डोंबिवलीची तेजश्री प्रधान कशी बनली प्रत्येक मराठी मुलाची क्रश! 18 वर्ष करतेय तरुणांच्या मनावर राज्य
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेय तेजश्री प्रत्येक मराठी मुलाची क्रश आहे. डोंबिवलीची तेजश्री कशी बनली तरुणांची क्रश?
advertisement
1/8

अभिनेत्री होण्यासाठी अनेक अभिनेत्री येतात आणि जातात. पण फार कमी अभिनेत्री अशा आहेत ज्या अभिनय क्षेत्रात आपली छाप उमटवतात आणि ती कायम ठेवतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच तेजश्री प्रधानचे फॅन्स आहेत. मुळची डोंबिवलीची असणारी तेजश्री प्रधान अभिनय क्षेत्रात आली आणि इथलीच झाली.
advertisement
2/8
तेजश्री प्रधानलाा सायकोलॉजिस्ट व्हायचं होतं. पण अभिनयाची आवड तिला मनोरंजन विश्वात घेऊन आली. 'ह्या गोजिरवाण्या घरात' या मालिकेतून तेजश्रीने मालिका विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तेजश्रीला मागे वळून पाहावं लागलं नाही.
advertisement
3/8
'लेक लाडकी ह्या घरची', 'तुझं नि माझं घर श्रीमंताचं', 'होणार सून मी ह्या घरची', 'अग्गंबाई सासूबाई', 'प्रेमाची गोष्ट' ते आता 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेपर्यंत गेली 17 वर्ष तेजश्री मराठी मालिका विश्वात आपलं हक्काचं स्थान टिकवून आहे.
advertisement
4/8
'वीण दोघांतली ही तुटेना' ही तेजश्रीची प्रमुख नायिका असलेली सलग पाचवी मालिका आहे. तेजश्रीनं तिची प्रमुख नायिका होण्याचा मान कधीच ढळू दिला नाही. सर्वाधिक मानधन घेणारी सर्वाधिक लोकप्रिय नायिकांपैकी सर्वात आघाडीवर तेजश्री प्रधान आहे.
advertisement
5/8
मालिका आणि सिनेमांत काम करत असताना प्रत्येक कलाकाराला आपलं नाव कमावण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. तेजश्रीच्या वाट्याला तो स्ट्रगल आला. डोंबिवलीतून सकाळी पहिली लोकल पकडून मुंबईत शूटींगला येऊन रात्री शेवटची लोकल पकडून डोंबिवलीला जाणं असा स्ट्रगल तेजश्रीच्याही वाट्याला आला.
advertisement
6/8
इतक्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेली तेजश्री तिच्या दोन कॅरेक्टर्समुळे प्रत्येक मराठी मुलाची क्रश बनली. त्यातील तिचं एक कॅरेक्टर म्हणजे जान्हवी. 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेत तेजश्रीनं साकारलेली जान्हवीची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली. जान्हवीमुळे तेजश्री महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. आजही जान्हवी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
advertisement
7/8
प्रेक्षकांना आवडलेलं तेजश्रीचं दुसरं कॅरेक्टर म्हणजे तन्वी. ती सध्या काय करते या सिनेमात तेजश्रीनं तन्वी हे पात्र साकारलं होतं. तिच्या या कॅरेक्टरलाही प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. एकीकडे जान्हवी आणि दुसरीकडे तन्वी, तेजश्रीची ही दोन्ही पात्र प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहेत.
advertisement
8/8
"प्रत्येक मराठी मुलगा हे रिलेट करू शकतो. प्रत्येक मराठी मुलाची पहिली क्रश. मग ती जान्हवी असो किंवा तन्वी या आयकॉनिक कॅरेक्टर्सपैकी एक", असं म्हणत जान्हवीच्या चाहत्यानं देखील पोस्ट शेअर केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : डोंबिवलीची तेजश्री प्रधान कशी बनली प्रत्येक मराठी मुलाची क्रश! 18 वर्ष करतेय तरुणांच्या मनावर राज्य