TRENDING:

राहुल देशपांडे ते योगिता चव्हाण, 2025 संपण्याआधी मोडला या मराठी सेलिब्रिटींचा संसार

Last Updated:
Marathi Celebrity Divorce 2025 : मराठी सिने-इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांचा 2025 या वर्षात घटस्फोट झाला आहे. यात राहुल देशपांडे, योगिता चव्हाणसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.
advertisement
1/7
2025 संपण्याआधी मोडला या मराठी सेलिब्रिटींचा संसार
बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडे प्रेक्षक आदर्श जोडपं म्हणून पाहत असतात. अनेकदा हे कपल गोल्स देणारे सेलिब्रिटी अचानक घटस्फोट घेणार असल्याचं किंवा जाहीर केल्याचं जाहीर करतात तेव्हा मात्र चाहत्यांना मोठा धक्का बसतो.
advertisement
2/7
2025 या वर्षात मराठी इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींचा संसार अर्ध्यावर मोडला आहे. खरंतर विभक्त होण्याचा निर्णय घेणं ही मराठी सेलिब्रिटींसाठी खूप कठीण गोष्ट असते. कारण घटस्फोटानंतर हे सेलिब्रिटी चांगलेच चर्चेत येतात. 2025 मध्ये घटस्फोट झालेल्या काही सेलिब्रिटींनी तर लगेचच नव्या वैवाहिक आयुष्याचीही सुरुवात केली आहे.
advertisement
3/7
मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी 2025 मध्ये लग्नानंतर अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेतला आहे. तर काहींच्या आयुष्यात लग्नानंतर लगेचच दुरावा आला आहे. गेल्या काही महिन्यात मराठी इंडस्ट्रीत घटस्फोटाचा ट्रेंड (Divorce Trend) पाहायला मिळाला आहे.
advertisement
4/7
योगिता चव्हाण - सौरभ चौघुले (Yogita Chavan Saurabh Choughule) : 'जीव माझा गुंतला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले 3 मार्च 2024 रोजी विवाहबंधनात अडकले. योगिता आणि सौरभ यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण लग्नानंतर वर्षभरातच त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो डिलिट केले आहेत. तसेच सोशल मीडियावरुनही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. 'जीव माझा गुंतला' या मालिकेतील योगिता आणि सौरभ यांची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अद्याप घटस्फोटाबद्दल दोघांनीही काही वक्तव्य केलेलं नाही.
advertisement
5/7
अक्षया गुरव - भूषण वाणी (Akshaya Gurav Bhushan Wani) : मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी अर्थात अक्षया गुरव आणि भूषण वाणी यांनी 23 मे 2017 रोजी थाटामाटात लग्न केलं होतं. पण आता ऑक्टोबर 2025 मध्ये दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं आहे. तसेच त्यांनी लग्नाचे फोटोही डिलिट केले आहेत. लग्नाच्या आठ वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. पण घटस्फोटाचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अक्षया ही लोकप्रिय अभिनेत्री असून भूषण हा डिओपी आहे. एका मित्राद्वारे त्यांची पहिली भेट झाली होती. पहिल्या भेटीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
6/7
राहुल देशपांडे - नेहा देशपांडे (Rahul Deshpande - Neha Deshpande) : प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा लग्नानंतर 17 वर्षांनी नेहा देशपांडे यांच्यासोबत घटस्फोट झाला. राहुल देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली. दोघांनी एकमेकांच्या संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे घटस्फोट झाला असला तरी त्यांची मैत्री कायम राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. दोघांचा एकमेकांबद्दलचा आदर आजही कायम आहे. तसेच मुलगी रेनुकाच्या हिताचा दोघेही विचार करत आहेत.
advertisement
7/7
शुभांगी सदावर्ते - आनंद ओक (Shubhangi Sadavarte Anand Oak) : 'संगीत देवभाबळी' या सुप्रसिद्ध नाटकात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक 2020 मध्ये कोरोनाकाळात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाहबंधनात अडकले. पण पाच वर्षांच्या सुखी संसारानंतर आता सप्टेंबर 2025 मधअये त्यांनी घटस्फोटाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. घटस्फोटानंतर अवघ्या तीन महिन्यांतच शुभांगी सदावर्तेने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. आनंद ओक यांच्यासोबतच्या घटस्फोटानंतर शुभांगी आता 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेचा निर्माता सुमित म्हशीलकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राहुल देशपांडे ते योगिता चव्हाण, 2025 संपण्याआधी मोडला या मराठी सेलिब्रिटींचा संसार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल