TRENDING:

Tejashri Pradhan : 'प्रेमाची गोष्ट' नंतर 'वीण दोघांतली...' मालिकेलाही तेजश्री प्रधानचा रामराम? आता काय कारण!

Last Updated:
Tejashri Pradhan Serial : 'प्रेमाची गोष्ट' मालिका अर्ध्यात सोडल्यानंतर आता तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतूनही एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काय आहे यामागचं कारण?
advertisement
1/9
'प्रेमाची गोष्ट' नंतर 'वीण दोघांतली...' मालिकेलाही तेजश्री प्रधानचा रामराम?
मालिकाविश्वातील प्रेक्षकांची लाडकी नायिका म्हणजे तेजश्री प्रधान. गेली दहाहून अधिक वर्ष तेजश्री तिच्या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय.
advertisement
2/9
तेजश्री सध्या झी मराठीच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत तिने साकारलेली स्वानंदी प्रेक्षकांना आवडतेय.
advertisement
3/9
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेच्या आधी तेजश्री प्रधान स्टार प्रवाहच्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत काम करत होती. मात्र तिने ही मालिका अर्ध्यातच सोडली.
advertisement
4/9
'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर अचानक तेजश्री झी मराठीच्या 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत दिसली. त्यामुळे चाहत्यांनीही आश्चर्य व्यक्त केलं.
advertisement
5/9
दरम्यान आता 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतूनही तेजश्री प्रधान एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा ऐकून तेजश्रीच्या चाहत्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
advertisement
6/9
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत सध्या स्वानंदी आणि समर यांच्या लग्नसोहळा विशेष एपिसोड सुरू आहे. अशावेळी तेजश्री मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
7/9
तेजश्री मालिका सोडणार आहे या चर्चांसाठी तिचीच एक पोस्ट कारण ठरली आहे. तेजश्रीने नुकतीच एक पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीला शेअर केली आहे. ती पोस्ट वाचून या चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
8/9
तेजश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती एका सोफ्यावर बसली आहे. तिच्यासमोर एक माणूस बसला असून तो तिला काहीतरी समजावत आहेत. तेजश्री देखील त्यांचं बोलणं मन लावून ऐकत आहे. तिच्या समोर काही पेपरही ठेवले आहेत.
advertisement
9/9
#newwebseries #newworkinprogress असे हॅशटॅग हिने या फोटोसहीत शेअर केले आहेत. तेजश्री प्रधान नव्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. मग त्यासाठी ती मालिका सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तेजश्रीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : 'प्रेमाची गोष्ट' नंतर 'वीण दोघांतली...' मालिकेलाही तेजश्री प्रधानचा रामराम? आता काय कारण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल